आटपाडी तालुक्यातील संगणक परीचालकांची दिपावळी अंधारात साजरी…..
संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन सुरू
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील संगणक परिचालकांना दिवाळीचे मानधन किंवा बोनस देण्यात आला नाही त्यामुळे संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात गेली आहे. याबाबत गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांना निवेदन देऊन संपूर्ण तालुक्यातील संगणक परिचालकांचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील शासनाचा ‘आपले सरकार, सेवा प्रकल्प’ हा नावारूपास आलेला उपक्रम असून संगणक परिचालक यांच्या भरवशावर सुरू असून, या संगणक परिचालकांची दिवाळी मानधनाविना अंधारात गेली. मागील वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनाची सरकारने पूर्तता न केल्याने राज्यातील सर्व संगणक परिचालक शुक्रवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
त्यामुळे आता ग्राम पंचायतच्या कामकाज खोळंबणार आहेत.तरी डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात संगणक परिचालक यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात लेखी आश्वासन दिले होते. पण, वर्षभरात त्याची कोणतीही मागणी मंजूर झाली नाही. त्यामुळे संगणक परिचालक संघटनेकडून राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले आहे.
याबाबत गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांना याबाबतचे निवेदन देऊन तालुक्यातील सर्व संगणक परिचालक यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्राम पंचायतचे सर्व कामकाज बंद झाले असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.
त्यामुळे राज्यशासनाने संगणक परिचालक यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी तात्यासाहेब मंडले तालुकाध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष अविनाश शिंदे,सुनील गायकवाड,स्वप्नील गायकवाड,वैभव माने,विकास कदम,नाना चव्हाण,सागर मोरे,विशाल यादव,सागर करडे,प्रवीण तोरणे,शरद कोळेकर,पोपट पारेकर,बापू झंजे,विजय मोटे,आदिनाथ सावंत,राहुल जाधव,आकाश सावंत,अमोल चव्हाण,अमोल विभूते,गणेश देवडकर,गोरख सरगर,कुमार हातेकर,महादेव गळवे,समाधान राक्षे,समाधान सरक,सुनील पुजारी,सुरेश डिगोळे,तातोबा यमगर,व महिला प्रतिनिधी तेस्विनी गुरव,राणी कदम,शोभा गायकवाड यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व संगणक परिचालकांनी आज पासून ऑनलाईन व ऑफलाईन कामकाज बंद केले आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांना देण्यात आले आहे.
फोटो .. गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांना निवेदन देताना संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी







