दिघंची निंबवडे परिसरात दुष्काळात अवकाळी चा दणका.
दिघंची व निंबवडे परिसरात दुष्काळाने थैमान घातलेले असताना या भागातील शेतकऱ्यांनी थोड्याफार पाण्यावर मका, द्राक्ष व केळी अशी पिके घेतली होती ती कशीबशी तर शेतकरी जोपासण्याचे काम करत असताना आणि दुष्काळाच्या खाईत सुद्धा करत असताना आज मंगळवार दिनांक 28 रोजी अवकाळी पावसाने दणका दिल्यामुळे द्राक्ष केळी व मक्याचे नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे
अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान न भरून निघणारे झाले आहे अशी शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे. या अवकाळी पावसाचा ना फायदा ना तोटा अशी परिस्थिती झाली आहे.
एक तरी या भागात दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणात असताना या भागातील शेतकरी तटपूंजा पाणीसाठावर कसेबसे पशुपालनासाठी शेती करत आहे तर काही ठिकाणी बऱ्यापैकी पाणीसाठा आहे त्या ठिकाणी केळी व द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी लावल्या आहेत परंतु या अवकाळी पावसाने द्राक्ष बागा व केळी बागांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे.
आज मंगळवार रोजी जवळजवळ तीन ते साडेतीन तास अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान भरून न निघणारे झाले आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करून त्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.