आटपाडीत महिलांसाठी दोन स्वच्छतगृहाचा निधी खर्च, पण एक सदाबंद.दुसरे कागदावरच
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी ता.आटपाडी येथे खासदार स्थानिक विकास निधीतून सन 2020 मध्ये बाजार पटांगण व तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये महिलासाठी स्वच्छता ग्रह बांधण्यासाठी 3 लाख 36 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
त्यापैकी बाजार पटांगण हद्दीत महिलासाठी स्वच्छतागृह चे बांधकाम केले आहे. पण ते कुलूपबंद आहे .तर तहसील कार्यालय आवाल्यातील स्वच्छता ग्रह मात्र प्रत्यक्षात नसून ते कागदावरच आहे.
त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातून विविध कामासाठी येणाऱ्या महिलांना लघुशंकेसाठी कुठे जायचं हा प्रश्न निर्माण होत आहे.
तर नगरपंचायत हद्दीत बाजार पटांगणात बांधलेले स्वच्छतागृह हे सतत बंद अवस्थेत असते .या स्वच्छता ग्रहाला बाहेरून भले मोठे कुलूप लावलेले आहे. त्यामुळे बाजारादिवशी बाजार विक्रीसाठी व खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना बाजार पटांगणात स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हटलं तर आटपाडी बाजारपेठ आहे. येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरतो .तसेच तालुक्यातील विविध कामासाठी तालुक्यातील खेड्यापाड्यातून महिला विविध कामासाठी व खरेदीसाठी येत असतात. परंतु तहसील कार्यालयासमोर व बाजारपेठेत कुठेही लघुसंखेसाठी स्वच्छता ग्रह नाही. याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही.
आटपाडी मध्ये सध्या नगरपंचायत आहे. व बाजार पटांगणातील स्वच्छता ग्रह हे नगरपंचायत च्या ताब्यामध्ये आहे. परंतु स्वच्छतागृहाला बाहेरून सतत कुलूपच असते. तसेच खासदार स्थानिक विकास निधीतून महिलांसाठी दोन स्वच्छ्तागृहासाठी निधी मंजूर झाला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र बाजारपेठांमध्ये एक शौचालय बांधलेले आहे. दुसरे तहसील कार्यालयाच्या आवांरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह कुठेही बांधकाम झालेले दिसून येत नाही.
याबाबत तहसीलदार सागर ढवळे यांच्याशी संपर्क साधून तहसील कार्यालयाच्या आवारातील महिलांच्या स्वच्छतागृहाबाबत विचारणा केली असता त्यांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला होता. बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले की दोन स्वच्छतागृह मंजूर झाली होती. त्यापैकी एक तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये तर दुसरे बाजार पटांगनामध्ये बांधकाम करायचे होते. परंतु निधी कमी पडत असल्याने दोन्ही निधी एकत्र वापरून बाजार पटांगणामध्ये स्वच्छता ग्रहाचे बांधकाम करण्यात आले आहे. असे उत्तर बांधकाम विभागाकडून मिळाले.
परंतु स्वच्छता ग्रह मंजूर होताना दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणची नावे टाकून स्वच्छतागृह मंजूर झाली होती. मग तो निधी एकत्र वापरता येतो का ? व जे बाजार पटांगणातील स्वच्छता ग्रहाचे बांधकाम केले आहे ते तेवढ्या रकमेचे आहे का ? याबाबत नागरिकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे. कारण 3 लाख छत्तीस हजार रुपयेचे बाजार पटापणातील स्वच्छतागृह नसल्याचे नागरिकातून चर्चा सुरू आहे.
तर मग एकच स्वच्छतागृह बांधून दोन निधी वापरले की काय ?अशीही नागरिकाकडून चर्चा सुरू आहे. तर मग तहसील कार्यालयाच्या आवारात महिलासाठी स्वच्छतागृह होणार की नाही हा गंभीर प्रश्न आहे.
चौकट..
खासदार यांच्या स्थानिक विकास निधीतून तहसील कार्यालयाच्या आवारात मध्ये व बाजार पटांगण येथे 3 लाख 36 हजार रुपये निधीचे दोन शौचालय महिलांसाठी मंजूर झाली होती. सध्या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये कुठेही स्वच्छतागृह बांधकाम दिसून येत नाही. तर बाजार पठारांमध्ये स्वच्छतागृहाचे बांधकाम झाले आहे परंतु त्याला बाहेरून मोठाले कुलूप लावले आहे.
2., याबाबत तहसीलदार सागर ढवळे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी पंचायत समिती बांधकाम विभागास विचारणा केली असता ,बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले की एवढ्या निधीमध्ये स्वच्छतागृह होत नसल्याने बाजार पटांगण मध्ये एकच स्वच्छतागृहाचे बांधकाम केले आहे.
3. दोन वेगवेगळ्या ठिकाणचा स्वच्छता ग्रहाचा निधी एकाच स्वच्छतागृहावर खर्च करता येतो का ? याबाबत कोणत्याही खात्याकडून स्पष्टीकरण मिळाले नाही.







