आटपाडीतील उत्कृष्ट शेळ्या मेंढ्यांच्या आठवडी बाजाराला झिरो पोलिसांची दृष्ट…..
वाहनधारकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास,बाजारावर होणार परिणाम
आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी मार्केट कमिटीमध्ये पश्चिम महााष्ट्रातील सर्वात मोठा दर शनिवारी शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरत असतो . यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी खरेदी ..विक्री साठी येत असतात . परंतु शेळ्या मेंढ्या घेऊन येणाऱ्या वाहनांना झिरो पोलिसांची दृष्ट लागली आहे.जनावरे घेऊन येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांकडून ट्रॅफिक पोलिस व झिरो पोलीस पैसे घेतल्याशिवाय मार्केट कमिटीच्या गेटच्या आत मध्ये वाहन सोडत नाहीत. याचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. या हप्ते खोरीमुळे वाहनधारक जनावरे घेऊन येण्यास टाळाटाळ करू लागले आहेत, जनावरांचा बाजार भरण्यावर परिणाम होऊ लागला आहे. ही हप्ता पद्धत तातडीने बंद व्हावी, अशी मागणी व्यापारी व शेतकयांतून होत आहे.
आटपाडी हा दुष्काळग्रस्त तालुका आहे.तालुक्यात मार्केट कमिटीच्या माध्यमातून दर शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जनावरांसह शेळीमेंढ्यांचा आठवडी बाजार भरतो. पण इथे आठ दहा झिरो पोलिसां कडून प्रत्येक लहान मोठ्या वाहनधारकांकडून पैसे गोळा केले जातात. त्याची पावती दिली जात नाही. अशा प्रवृत्तीच्या त्रासाने शेतकरी वैतागला आहे.
तरी आठवडी बाजारासाठी येणाऱ्या वाहनधारकाला कोणताही त्रास होऊ नये व कोणाकडूनही हप्ता गोळा करू नये अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे या बाजारामध्ये घेऊन येणारे सर्व शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी अनेक धोरणे शासन राबवत आहे परंतु आटपाडी तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांची बाजारादिवशी लूट होत आहे अन्यथा बसपाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतोष हेगडे यांनी दिला आहे
प्रतिक्रिया
१९ ऑक्टोबरला मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस प्रमुख, आटपाडी पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे. काही कारवाही होते का याची वाट पाहून मंत्रालयासमोर आंदोलनास बसणार आहोत. त्यावेळी आटपाडी मार्केट कमिटीसमोरच्या पोलिसांच्या आशीर्वादाने झिरो पोलीस हप्ता गोळा करतात हा मुद्दा पण घेणार आहोत. –
संतोष हेगडे, बसपा अध्यक्ष, आटपाडी -खानापूर विधानसभा
चौकट.. अशी महाराष्ट्रातील सर्वात मोठा दर शनिवारी शेळी मेंढ्यांचा बाजार भरत असतो या बाजारांमध्ये सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यातून शेळ्या मेंढ्या विक्रीसाठी येत असतात तसेच कर्नाटक राज्यातून सुद्धा व्यापारी या बाजारासाठी येत असतात परंतु या बाजाराला शेळ्या मेंढ्या घेऊन येणारे वाहनधारक यांना झिरो पोलिसांकडून हा त्रास होतो त्यामुळे वाहनधारक शनिवारच्या बाजाराला येण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे भविष्यात बाजार मोठे काय याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
- या सर्व गोष्टी पोलिस स्टेशनला माहीत असून सुद्धा पोलीस खात्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. मग नक्की काय गौडबंगाल आहे हे समजायला मार्ग नाही. पोलीस स्टेशनकडूनच झिरो पोलिसांना साथ दिली जात आहे की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.






