डॉ. विजयकुमार पाटील यांची पन्हाळा (कोतोली) येथे प्राचार्यपदी नियुक्ती.
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथील कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी व श्रीराम ज्युनिअर कॉलेज आटपाडीचे प्रभारी प्राचार्य व अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख ,सहयोगी प्राध्यापक डॉ. विजयकुमार पाटील यांची ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळंवाडी संचलित, श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळंवाडी — कोतोली. ता. पन्हाळा येथील अनुदानित महाविद्यालयात रितसर शिवाजी विद्यापीठाच्या निवड समितीच्या वतीने प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली . 14 डिसेंबर २०२३ रोजी त्यांनी त्या महाविद्यालयाचा प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला.
डॉ. विजयकुमार पाटील यांनी सन २०२–३ ते सन २०२२–२३ या या प्रदीर्घ २२ वर्षाच्या काळात कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून काम पाहिले. महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये व विकासामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. या महाविद्यालयास त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सन २०२३–२४ ते सन २०२५–२६ या तीन वर्षासाठी संलग्निकरण मिळवून दिले. तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची ट्रिपल ए कमिटी कडून मूल्यांकन करून घेऊन बी मानांकन प्राप्त झालेले आहे हे मानांकन शिवाजी विद्यापीठांमध्ये विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कोणत्याही महाविद्यालयास प्राप्त झालेले नाही त्याचबरोबर या महाविद्यालयाची न्याक मूल्यांकनाची प्रक्रियाही सध्या त्यांच्याच काळामध्ये सुरू झाली असून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहाय्याने न्याकचा एस. एस. आर. यशस्वीरित्या त्यांनी न्याक कार्यालय बेंगलोर यांच्याकडे ऑनलाईन सबमिट केलेला आहे.
डॉ. विजयकुमार पाटील हे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित असून ते अर्थशास्त्राचे लेखक,अभ्यासक व साक्षेपी संशोधक व समीक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. अर्थशास्त्रा मधील विविध विषयावर त्यांनी अत्यंत मूलभूत स्वरूपाचे संशोधन केलेले आहे. इचलकरंजी, सातारा, कोल्हापूर, तासगाव, सांगली, मिरज, कवठेमंकाळ , इस्लामपूर , पलूस, विटा, हलकर्णी, पाचगणी, शिवाजी विद्यापीठ , जयसिंगपूर, सावळज, गडहिंग्लज , इत्यादी ठिकाणी झालेल्या विभागीय व राष्ट्रीय चर्चासत्रां मधून व कार्यशाळा मधूनही ते सहभागी झालेले आहेत. शिवाय, आंध्र प्रदेश, दिल्ली, विशाखापट्टण, हैदराबाद, ओरिसा , गोवा, इत्यादी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या कार्यशाळामधूनही सहभागी होऊन विविध विषयावर अनेक शोधनिबंधही प्रकाशित केले आहेत. शिवाजी विद्यापीठाचे एम. फिल , व पीएच. डी. चे ते मान्यताप्राप्त मार्गदर्शक आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केलेली आहे व तीन विद्यार्थी संशोधनाचे कार्य करीत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे ते माझी सदस्य आहेत.
याबरोबरच त्यांनी स्वतः संशोधन करीत असताना सांगली जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत जवाहर विहिरींचे आर्थिक मूल्यमापन, या विषयावरती केलेले संशोधन हे अत्यंत मुलगा मी स्वरूपाचे असून त्याचा लाभ आज महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना होत आहेर.तसेच ते भारतीय अर्थशास्त्र परिषदेचे, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे, आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोशियन कोल्हापूरचे ते आजीव सदस्य आहेत. त्यांच्या या प्राचार्य पदाच्या निवडीनंतर श्रीराम सेवाभावी संस्थेचे चेअरमन, तानाजीराव पाटील व सचिव शिवाजीराव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून व मान्यवरांच्याकडून अभिनंदन होत आहे.
Show quoted text







