आटपाडी पोलिसांची धडक कारवाई…. खरसुंडी परिसरात 1,06,540 रुपयाचा दारुसाठा जप्त…
आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी गावचे हद्दीमध्ये खरसुंडी ते नेलकरंजी रोडवर हॉटेल दरबार ढाब्या समोर बेकायदा बिगर परवाना देशी व विदेशी दारुच्या बाटल्या बॉक्स पोत्यामध्ये घालुन स्कुटी दुचाकी क्रमांक एम.एच. 10 ई. बी. 6862 वरुन घेवुन येत असताना जवळपास 1,06,540/- रु किमतीची दारु माल तसेच स्कुटीसह मिळुन आला आहे.
याबाबत स्वतः पो.हे. कॉन्स्टेबल प्रमोद रोडे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की अमन साजिद शेख वय 23 वर्षे, रा- बेंद्री रोड, तासगांव व मागे बसणारा 2) अनिकेत चंद्रकांत राक्षे वय 30 वर्षे, रा-पुणदी रोड, तासगांव हे खरसुंडी गावचे हद्दीमध्ये खरसुंडी ते नेलकरंजी रोडवर असलेल्या हॉटेल दरबार ढाब्या समोर दारूच्या बाटल्या घेऊन असताना पोलिसाना आधळून आले.
यामध्ये 14,400 रुपयाची विदेशी दारु मॅकडॉल विस्की कंपनीच्या 180 मि.ली. चे 2 बॉक्स प्रति बॉक्स मध्ये 48 बाटल्या अशा एकुण 96 बाटल्या प्रति बाटली 150 रु प्रमाणे.मिळून आले.
तसेच 8640 रुपयाचे विदेशी दारु रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मि.ली. च्या 01 बॉक्स प्रति बॉक्स मध्ये 48 बाटल्या अशा एकुण 48 बाटल्या प्रति बाटली 180 रु प्रमाणे तर 3500 रुपयाचे एक प्लॅस्टिकचे पोते त्यामध्ये देशी दारु रॉयल संत्रा कंपनीच्या 90 मि.ली.च्या प्रति बाटली 35 रु प्रमाणे, तसेच 80,000 रुपये किमतीची एक सिल्व्हर रंगाची, स्कुटी दुचाकी, सुझुकी दुचाकी तिचा क्रमांक एम.एच. 10 ई.बी.6862 असा एकूण 1,06,540 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.
बेकायदा बिगर परवाना देशी व विदेशी दारुच्या बाटल्या बॉक्स तसेच पोत्यामध्ये घालुन स्कुटी दुचाकी क्रमांक एम.एच. 10 ई. बी. 6862 वरुन घेवुन येत असताना एकुण 1,06,540 रु किमतीची दारु माल तसेच स्कुटीसह मिळुन आलेले आहेत . त्यामुळे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करून व सदर गुन्हाची FIR प्रत मा.JMFC सो आटपाडी यांचे न्यायालयात मुदतीत पाठवणेची तजवीज ठेवली असुन सदर गुन्हाचा पुढील तपास पोनि सो मेमाणे यांचे आदेशाने पो.हे.काँ शिंदे करीत आहेत.







