• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

सार्वजनिक सेवा समिती संचालित पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्येष्ठ निवास, खराडी.

माणगंगा by माणगंगा
August 13, 2021
in पुणे
0
सार्वजनिक सेवा समिती संचालित पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्येष्ठ निवास, खराडी.

सार्वजनिक सेवा समिती संचालित
पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्येष्ठ निवास, खराडी.


पुणे स्टेशन पासून 11 किलोमीटर अंतरावर पी एम पी एम एल बस थांब्याचे हे शेवटचे स्थानक !
कोणत्याही जात ,धर्म व पंथातील ज्येष्ठ स्त्री-पुरुषांना जीवनाची सेकंड इनिंग शांत आणि सुरक्षित वातावरणात व्यतीथ करण्यासाठी ‘बेहरे जेष्ठ निवास ‘ हा एक उत्तम पर्याय आहे…’ ना नफा – ना तोटा ‘ या तत्त्वावर चालणारा !!!!
एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला ट्रायल बेसिस वर ,योग्य आकार देऊन ,इथे येऊन राहता येऊ शकते. परदेशात असणाऱ्या मुलांना आपल्या आई बाबांची काळजी करत बसण्यापेक्षा त्यांचा हा रिटायरमेंट चा काळ सुंदर क्षणांनी प्रस्थापित करून त्यांचं दुसरं बालपण समृद्ध करण्यासाठी हा ज्येष्ठ निवास कायम सज्ज आहे.


सध्या येथे 75 खोल्यांमध्ये साधारण 80 लोक अगदी गुण्यागोविंदाने राहत आहेत. कर्मचारी मिळून साधारण 120 लोक या संस्थेमध्ये राहतात .कर्मचाऱ्यांना वेगळ्या क्वॉटर्स आहेत. निवासात प्रत्येकाला स्वतंत्र खोली आहे आणि समजा नवरा -बायको असतील तर ते एका खोलीत राहू शकतात .खोल्या खूपच प्रशस्त आहेत .खोलीला छोटी बाल्कनी आणि पुढे मोठा व्हरांडा आहे आहे

.निवासाची रचनाच अशी आहे की इथे कोणालाच एकटेपण जाणवत नाही . संस्थेकडून खोलीत आवश्यक त्या गोष्टी दिल्या जातात उदाहरणार्थ:- पलंग ,टेबल, खुर्च्या, पंखा ,कपाट इत्यादी. पण इथे एक विशेष म्हणजे आपल्या घरातूनही हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही आणू शकता जसं -, वॉशिंग मशीन ,टीव्ही वगैरे. त्यासाठी वेगळा इलेक्ट्रिक चार्ज भरावा लागतो .इथे सकाळी सोलरच गरम पाणी मिळतं आणि गार पाणी 24 तास उपलब्ध असतं.. एकावेळी 50 ते 60 लोक जेवायला बसू शकतील एवढा मोठा डायनिंग हॉल पण येथे आहे. जेवण शाकाहारी असून साधं पण अतिशय ,रुचकर सात्विक आणि चविष्ट असतं .

ज्येष्ठ लोकांच्या आवडीनुसार, पथ्यानुसर स्वयंपाक केला जातो. सकाळी चहा, नाश्ता ,दुपारचे जेवण ,संध्याकाळी चहा, नाश्ता आणि रात्रीचे जेवण अशा शिस्तबद्ध पद्धतीने आणि आपुलकीने हे सर्व केलं जात. इथे अजूनही एक मोठा हॉल आहे, तिथे दर आठवड्याला संस्थेतर्फे उत्तमोत्तम दर्जेदार करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात .हॉल मध्ये साधारण दोन हजार पुस्तकांची लायब्ररी आहे, त्यात विविध विषयांवरील पुस्तके लोकांना मोफत वाचायला मिळू शकतात .हॉलमध्ये कॉमन टीव्ही आणि पेपर वाचनाची सोय आहे. इथे सगळे ज्येष्ठ निवासी असल्यामुळे दर दिवशी डॉक्टरांकडून सगळ्यांचे बीपी आणि वजन घेतले जाते आणि त्याची नोंद प्रत्येकाच्या फाईल मध्ये केली जाते . ज्या व्यक्तीला मदतनीसाची आवश्यकता असेल त्यांना सशुल्क सेवा दिली जाते.निवासात जर कोणी मोठ्या दुखण्यामुळे आजारी झालं तर लगेच संस्थेच्या गाडीतून किंवा अँब्युलन्स मधून हॉस्पिटलमध्ये नेले जाते.


इथे प्रत्येक सणावाराला त्या त्या सणा प्रमाणे पक्वान्नं बनवले जाते .जसे -दसऱ्याला श्रीखंड तर होळीला पूरणपोळी, गणपतीला उकडीचे मोदक तर शिवरात्रीला उपवासाचे पदार्थ !त्यामुळे प्रत्येकाला आपण आपल्या घरीच असल्यासारखे वाटते. इथे सगळे सण म्हणजे दहीहंडी, गणपती , दसरा,लक्ष्मीपूजन,तिळगुळ समारंभ, होळी यांसारखे सण आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारी रोजी झेंडा वंदन संस्थेतर्फे केले जाते.
ज्येष्ठ निवासाचा परिसर अतिशय प्रशस्त आणि नयनरम्य आहे .निसर्गरम्य शांत वातावरण ,हिरवेगार लॉन ,भरपूर झाड ,प्रवेशद्वारापासून संस्थेच्या गेटपर्यंत ज्येष्ठांना निवांत चालता यावं यासाठी छान वॉकवे ,झोपाळे, बसायला बाक वगैरे…


ज्येष्ठांना स्वतः जाऊन काही फळं किंवा काही वस्तू खरेदी करायची असेल तर संस्थेच्या गाडीतून त्यांना जाता येते.सगळ्यांची वर्षातून एकदा ट्रिप सुद्धा निघते .पुण्यात किंवा कोणा नातेवाइकांकडे जायचे असेल तर मात्र ऑफिसमध्ये सांगूनच बाहेर जावे लागते .इथल्या सदस्यांना त्यांचे नातेवाईक मित्र मंडळी भेटायला येऊ शकतात .आपल्या आई-वडिलांना सुखात आनंदात राहत असलेले पाहून तेही खूष होतात.


ही संस्था कोणतीही सरकारी मदत घेत नाही त्यामुळे मिळणाऱ्या देणग्या आणि सदस्यांकडून मिळणाऱ्या पैशावरच सगळा खर्च चालतो.
हल्ली बऱ्याच जणांची मुलं परदेशात असतात त्यांना तिकडे जाऊन राहायला आवडत नाही, काहींना मुलेच नसतात ,काहींचं मुलांशी पटत नाही तर काही वेळा मुलांनाच आपले पालक घरी नको असतात…


अशा स्थितीत ज्येष्ठ निवास हे त्यांच्यासाठी एक वरदानच आहे .
या ज्येष्ठ निवासात राहणारे आजी आजोबा बेहरे निवासाला ‘ आनंदाश्रम ‘म्हणतात तर काहीजण गमतीने ‘सीनियर सिटिझन्स होस्टेल ‘ म्हणतात.
बेहरे जेष्ठ निवासात असणारी प्रत्येक व्यक्ती अगदी समाधानाने आणि आपल्या हक्काच्या घराप्रमाणे येथे राहत आहे.


बेहरे जेष्ठ निवासाची व्यवस्था पाहणारे तीनही व्यवस्थापक आणि येथील सर्व कर्मचारी सर्वांशी अगदी आपुलकीने आणि प्रेमाने वागतात .संस्थेच्या सगळ्या विश्वस्तांच्या पण संस्थेत सतत भेटी होत असतात. तिथल्या सदस्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तत्परतेने सोडविल्या जातात ,त्यामुळे पद्मश्री अण्णासाहेब बेहरे निवास हे तिथे राहणाऱ्या सगळ्यांनाच स्वतःचे हक्काचे घर वाटतं आणि यातच संस्थेचे यश आहे,हे नक्की.

सौ.सुप्रिया अनिल दामले
विश्वस्त,बेहरे ज्येष्ठ निवास ,खराडी.
९८५०९६५२०७
८/८/२०२१

Views: 256
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!

श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)