पुण्यश्लोक आहिल्यदेवी होळकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा-डॉ प्रमोद गावडे.
दि.1 ऑगस्ट रोजी म्हसवड येथे पुण्यश्लोक आहिल्यदेवी होळकर यांची पुण्यतिथि निमित आदरांजली वाहिली ,यानिमित्ताने म्हसवड येथे लोकसहभागातून सुरु केलेल्या आम्ही म्हसवडकर कोविड सेंटर ला युवा उध्योजक श्री सुभाष सातपुते राजेवाडी ता.आटपाडी यानी पंचवीस हजार रुपये किमतीचे हॉस्पिटल उपयोगी साहित्य भेट दिले,त्या वस्तू चे लोकाअर्पण डॉ प्रमोद गावडे आणि म्हसवड नगरीचे नगराध्यक्ष श्री तुषार ऊर्फ भगतसिंग वीरकर यांचे शुभहस्ते करण्यात आले,
कोरोना सारख्या संकट काळात माणुस माणुसकी विसरत चालला आहे आणि या काळात पुण्यश्लोक आहिल्यदेवी होळकर यानी जी परोपकाराची आणि मानूसकी जपण्या ची शिकवण घालुन दिली आहे ती जपली पाहिजे,त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे असे प्रतिपादन डॉ प्रमोद गावडे यानी या वेळी बोलताना केले.
या कार्यक्रमाला म्हसवड नगरीचे नगराध्यक्ष श्री तुषार ऊर्फ भगतसिंग वीरकर,म्हसवड संस्थांनचे राजे श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने,आप्पा साहेब पुकळे ,दत्ता रोकडे ,डॉ राजेश शहा,डॉ काकडे,डॉ विलास सावंत,पै बाळासाहेब काळे,आकिल भाई काझी,कैलास भोरे,मनोहर सुर्यवंशी,राहुल मंगरूळे,लक्ष्मण काळे,धनाजी पिसाळ,अक्षय जानकर,आदी मान्यवर उपस्थित होते.








