त-हाडी येथील सभा मंडप लोकार्पणच्या प्रतिक्षेत
त-हाडी:-
प्रशासनाचे दुर्लक्ष पंधरा,लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आले होते सभा मंडप
त-हाडी-: तालुक्यातील त-हाडी येथील व परिसरा मधील गावात पंधरा लाखो रुपये खर्च करून. खासदार निधी मधून बांधलेल्या सभा मंडप अवस्था फारच बिकट झाली आहे.मात्र याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे.
त-हाडी मागील पाच वर्षांपासून खासदार निधी अंतर्गत बांधलेली सभा मंडप आज धूळखात पडली असून त्याचे फरशी पूर्णतः उखाडल्या असून भविष्यात तो कोसळण्याचा मार्गांवर आहे.
प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिसून येते कि, सभामंडपाचा बांधण्यात मागे एकच उद्देश होता की गावातील छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील या उद्देशाने बांधकाम करण्यात आले होते आता त्या ठीकांनी उकिरडा करत आहेत जनावरे, भटके ,कुत्राचे त्या ठिकाणी बस्थान आहे. असलेल्या या सभा मंडपकडे शासनाचे लक्ष नाही हे दुर्दैव समजावे लागेल शासनाने गेल्या पाच वर्षांपूर्वी लोक आग्रहास्तव गावात होणारे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी एक व्यासपीठ असावे म्हणून चांगल्या उद्देशपूर्तीने पंधरा लाखो रुपये खर्च करून सभा मंडप उभारले आहेत.
सभा मंडपची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे.कारणे जाणून घेतली असता निधी अभावी सदर बांधकामे अपूर्ण अवस्थेत आहेत. फरशी निघून लागले तर काही आहेत.केवळ शोभेच्या वस्तू म्हणून सभा मंडप उभी आहे भविष्यात पडून जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
त-हाडी येथील खंडेराव महाराज मंदिराकडे बांधण्यात आलेल्या सभा मंडप कडे दृष्टी टाकल्यास स्थानिक प्रशासनचे लक्ष नसल्याचे दिसण येते.शासनाने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी ज्या हेतूने हे भवन उभे केले आहेत त्यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च झाले परंतु शासनाचा हेतू मात्र सिद्ध झाला नाही.
चौकट
स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप न केल्याने सभा मंडप एका कोपऱ्यात बांधकाम केल्यामुळे त्या कोणत्या कार्यक्रमाला उपयोग होतो नाही व यामुळे गावातील नागरिकांनी त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याऐवजी उकिरडा व इतर वस्तू टाकून सभा मंडपाची दुरावस्था झाली आहे तरी तऱ्हाडी येथील स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप करून सभा मंडप दुरूस्ती करून लोकार्पण करावं अशी अपेक्षा तऱ्हाडी येथील नागरिकांनी केली आहे