• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, December 16, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

लोणचे बनविण्यासाठी गृहणीची लगीनघाई; आठवडे बाजारात गावरान कैऱ्या झाल्या आंबट

माणगंगा by माणगंगा
May 7, 2024
in महाराष्ट्र
0
लोणचे बनविण्यासाठी गृहणीची लगीनघाई; आठवडे बाजारात गावरान कैऱ्या झाल्या आंबट

लोणचे बनविण्यासाठी गृहणीची लगीनघाई; आठवडे बाजारात गावरान कैऱ्या झाल्या आंबट



त-हाडी;-

सर्वत्र खरिप पेरणीचे वेध लागले असून वरुणराजाची हजेरी लागण्यापूर्वी लोणचे बनविण्यासाठी गृहणीची लगीनघाई सुरू झाली आहे. परंतु दिवसेदिवस गावरान आमवृक्षाची कत्तल होऊन कलमीकरणाकडे सर्वांचाच ओढा वाढल्याने बाजारात गावरान कैऱ्याची आवक जेमतेम होऊन त्याचे भाव दामदुप्पट झाल्याने लोणच्यासाठी लागणाऱ्या गावरान कैऱ्या आंबट झाल्याचे चित्र मंगळवार (ता.७) वरुळ (ता.शिरपुर) येथील आठवडे बाजारात पाहवयास मिळाले.


पूर्वीच्या काळी सर्वांच्या पसंतीला उतरलेले गावरान आंब्यांची झाडे वृक्षतोडीमुळे दृष्टीआड झाले. त्यातही थोडेफार असलेल्या झाडांचा लगडलेला मोहोर ढगाळ वातावरण व उन्हाच्या प्रखतेमुळे झडून झाडांस जेमतेम कैऱ्या लगडल्या.पंधरा -विस दिवसांपासून अधूनमधून दररोज वादळी वारा सुटत असल्याने परिपक्वते पूर्वीच फळगळती होत असल्याने आंबा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.

अनेक आंबा उत्पादक ग्राहकांची लोणच्याला असलेली पसंती लक्षात घेऊन गावरान कैऱ्या आठवडे बाजारात विक्रीस आणत आहे. दरवर्षी तिनशे रुपये शेकडा मिळणाऱ्या लोणच्यासाठीच्या कैऱ्या यंदा सातशे ते आठशे रुपये शेकडा तर प्रति चाळीस रुपये किलो प्रमाणे बाजारात विकल्या जात आहे. परिणामी, यंदा लोणच्याची चवच महागली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा कैरी दुप्पटीने जवळपास पाच ते सहा रुपये प्रती नग झाली आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या मसाल्याचे दरही आकाशाला भिडून गरिबांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.


ग्रामीण व शहरी भागात पावसाळा व हिवाळा ऋतुत दररोजच्या भोजनासोबत आंब्याच्या लोणच्याचा सरार्स वापर केला जातो. भोजना चा स्वाद वाढविण्यासाठी विशेष लोणच्यावर भर दिला जातो. शेतावर जाणारे मजुर, कामगार, कष्टकरी भाकरी, ठेच्यासोबत लोणच्यास विशेष पसंती देतात. सध्या पेरणीपूर्व मशागतीचे कामे सुरू असल्याने गृहणी पेरणीपूर्वी सर्वत्र लोणचे बनविण्यासाठी घाई करतांना दिसत आहे.

कैऱ्यासोबतच लोणचे साठविण्यासाठी चिनी माती व काचेच्या बरण्या खरेदी करत आहे. कैऱ्या खरेदीपासून तर लोणचे तयार होईपर्यंत यंदा मोठा खर्च येत असल्याने गृहणीचा घरगुती हिशेब कोलमडला आहे.
लोणचे टाकण्यापूर्वी कैऱ्या फोडणे अनिर्वाह्य
असल्याने पन्नास रुपये शेकडयाप्रमाणे कैऱ्या च्या फोडी करून घ्याव्या लागत आहे. त्यामुळे कैऱ्या फोडणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. लोणच्यासाठी मीठ, मोहरी, हळद, तेल, लसुन, मिरे, लवंग, मेथी, तीळ , हिंग आदी वस्तु लागत असल्याने किराणा दुकानांवरही गर्दी पाहवयास मिळते.

सुषमा राजेंद्र बोरसे (गृहीणी, त-हाडी),’यंदा बाजारात लोणचे घालण्यासाठी लागणाऱ्या गावरान कैऱ्याची आवक खुप कमी असल्याने भावात दुप्पट वाढ झाली, त्यातच मसालेही महागले, कैऱ्या फोडणीचेही दर वाढून लोणच्याची चव महागली, परंतु भोजनाचा आस्वाद लोणच्या अभावी हरवल्यागत होतो. शेतावर जातांना भाकरीवर ठेचा अन् लोणचं असलं की गरज भागते.मात्र बाजारात मिळत असलेल्या लोण च्यापेक्षा घरगुती लोणचे महागात पडत आहे’

Views: 162
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिरपूर तालुक्यात वीर महाराणा प्रताप यांची मोठ्या उत्साहात साजरी करा :- डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांचे आवाहन

शिरपूर तालुक्यात वीर महाराणा प्रताप यांची मोठ्या उत्साहात साजरी करा :- डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
  • .. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
  • खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
  • नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)