शिरपूर तालुक्यात वीर महाराणा प्रताप यांची मोठ्या उत्साहात साजरी करा :- डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांचे आवाहन
त-हाडी
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात देशभरात आज वीर महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या थाटामाटात आनंदात साजरी करा असे आवाहन मराठी ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांनी केले आहे.
गावा गावात प्रत्येक ग्रामपंचायतीने वीर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात यावी.आपली वीरता हुशारी धाडसाचा साठी ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासाच्या पानावर कोरले गेले आहे तर प्रत्येक वर्षी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जात असून आज दि .९ मे २०२४ वी त्यांची ४८५ वी जयंती आहे ती मोठ्या आनंदात साजरी करा.
त्याची विधीवत पूजा करण्यात यावी
विर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त गावा गावात मिरवणूक निघेल तर महिलांनी आप आपल्या घरासमोर सडासारवण करून रांगोळी काढण्यात यावी. वीर महाराणा प्रताप हे एक वीर राजपूत योद्धा व उत्तम युद्ध राज नीती कार होते प्रत्येक तरुणाने यांचा आदर्श घेतला पाहिजे ही काळाची गरज आहे असेही आवाहन मराठी ग्रामीण पत्रकार संघ सचिव डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांनी केले आहे.
मिरवणूकीत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय जय श्रीराम या घोषणा देण्यात याव्यात असे आवाहन डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांनी केले आहे.