१५ अॉगस्ट २०२१ रोजी धावडवाडी येथे ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला
माणगंगा न्यूज धावडवाडी:
आज न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी या विद्यालयात १५ ऑगस्ट २०२१ रोजी ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .याप्रसंगी धावडवाडी एज्युकेशन सोसायटी धावडवाडी संस्थेचे अध्यक्ष माननीय मोहम्मद अली बाळासो शेख, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते. धावडवाडी एज्युकेशन सोसायटी धावडवाडी चे चेअरमन मोहम्मद अली बाळासो शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री शंकर आण्णाप्पा म्हमाने, डॉक्टर शब्बीर अकबर शेख, श्री महम्मद युसुफ बाबुलाल शेख, प्राध्यापक सुखदेव बाबासो वाघमोडे, श्री दिलीप आगतराव वाघमोडे (मुख्याध्यापक रेवनाळ हायस्कूल रेवनाळ) या शिक्षणप्रेमी बक्षीस दात्या कडून दिलेल्या बक्षिसांचे विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. आज फक्त इयत्ता दहावीतील गुणवंत बक्षीस पात्र करण कुमार दामोदर गायकवाड, राणी वसंत खांडेकर, माया लक्ष्मण यमगर, मायाक्का तानाजी वाघमारे, सपना भगवान खांडेकर , ओमकार अशोक वाघमोडे या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटण्यात आले उर्वरित इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वाटप यथावकाश विद्यालय सुरू झाल्यानंतर करण्यात येईल. याप्रसंगी पालक तानाजी वाघमारे, हिंदुराव खांडेकर व इतर पालक उपस्थित होते.







