• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कामावर रुजू होण्याचा आदेश एका दिवसातच मुंबई विद्यापीठाने आदेश माघारी घेतल्याने कालिदास शिंदे यांच्यावर झोळी घेऊन भिक्षा मागण्याची आली वेळ….

माणगंगा by माणगंगा
September 24, 2024
in Uncategorized
0
कामावर रुजू होण्याचा आदेश एका दिवसातच मुंबई विद्यापीठाने  आदेश माघारी घेतल्याने कालिदास शिंदे यांच्यावर झोळी घेऊन भिक्षा मागण्याची आली वेळ….

कामावर रुजू होण्याचा आदेश एका दिवसातच मुंबई विद्यापीठाने कोणतेही कारण न देता तो आदेश माघारी घेतल्याने झोळी घेऊन भिक्षा मागण्याची वेळ आली आहे….

पालावर राहून भटकंती करत शिक्षणाचा संघर्ष करत BA,MA,MSW, MPhil (टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई), डॉक्टरेट PhD देशातील अग्रगण्य विद्यापीठ( टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई) पूर्ण केली. इतक्या मोठया संघर्षातून उच्च शिक्षण घेऊनही शेवटी भिक्षा मागायला जाण्याची वेळ विद्यापीठाने माझ्यावर आणली आहे. माझे जिवन अनुभव व समाज जिवन झोळी आत्मकथन लिहून जगा समोर आणले आहेत, झोळी पुस्तकाला महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांचा मोठा पुरस्कार मिळाला आहे, त्याच बरोबर अन्य मानाचे 15 पुरस्कार मिळालेले आहेत. एक तर झोळी बाजूला ठेवून शिक्षण घेऊन जिवनात बदल करून माणूस म्हणून जिवन जगायचे ही अपेक्षा होती…

आजही मला न्याय मिळत नाही कोण दखल घेत नाही आम्हा भटक्या भिक्षेकरी कोणताच आवाज नाही, संघटन नाही जे या प्रश्नांवर लढेल. न्याय मिळवून देण्यासाठी कोण पुढेही येतं नाही. जगावं की मरावं हा प्रश्न माझ्या समोर उभा आहे. वयाची उच्च शिक्षण घेत घेत चाळीशी पूर्ण होत आहे, तरीही पूर्णवेळ काम नाही.

मी डॉ. कालिदास अंकुश शिंदे मुंबई विद्यापीठातील MSW विभागात 2020 पासून कार्यरत आहे.

मुंबई विद्यापीठ कुलसचिव कार्यालयाच्या माध्यमातून MSW विभागातून 6 ऑगस्ट,2024 रोजी order no.AAQA/ICD/2024-25/889 ने ईमेल द्वारे कामावर हजर राहण्यास आदेश मिळाला, तो आदेश एका दिवसातच 8 ऑगस्ट,2024 रोजी order no.AAQA/ICD/2024-25/978 ने दुपारी 2.30 वाजता माघारी घेण्यात आला आहे.

मला कामावर रूजू होणेसाठी पुरेसा अवधी मुंबई विद्यापीठाने दिलेला नाही. मला कामावर रूजू होणेसाठी पुरेसा अवधी न देता कामावर हजर होणे अगोदर तो कामावर रूजू होणेचा आदेश माघारी घेणेत आला आहे.

माझे सोबत कामावर रुजू होण्यासाठी आदेश मिळालेले श्री. महेंद्र ढोरे सहाय्यक प्राध्यापक, कंत्राटी हे 13 ऑगस्ट,2024 रोजी कामावर रुजू झाले आहेत. त्यांना ही कामावर रुजू होण्यासाठी माझ्या सोबत आदेश मिळाल्या नंतर त्यांना साधारणपणे 8 दिवस विलंबाने MSW विभागात कामावर रुजू करून घेतले आहे. मला मात्र कामावर रुजू होण्यासाठी एकच दिवसाचा वेळ विद्यापीठाकडून देणेत आलेला आहे. MSW विभागात कंत्राटी पद्धतीने भरणेत आलेल्या सहाय्यक प्राध्यापक यांना वेगवेगळा नियम लावणेत आलेला आहे.

मी अत्यंत मागास घटकातील भटक्या जमाती मधील आहेत. माझे कुटुंबीय भटकंती करून महाराष्ट्राची लोक संस्कृती गोंधळ, जागरण लोककला सादर करून उदरनिर्वाह करीत आहेत. मी भिक्षेकरी भटक्या समाजातून PhD पर्यंत उच्च शिक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून पूर्ण करणारा एकमेव आहे.

1 एप्रिल,2024 पासून विद्यापीठाकडून आम्हाला कामाचा ब्रेक मिळाला असल्याने माझे कुटुंबीय यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या मला कामांवर रुजू करून घेतले नसल्याने अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत आहे

सध्या गेल्या पाच महिन्यांपासून बेरोजगार असलेने उपासमारीची वेळ आली आहे…

Views: 217
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आमदार, नामदारकीच्या उंचीचे स्वनेतृत्व सुरज पाटील यांनी साकारावे .

आमदार, नामदारकीच्या उंचीचे स्वनेतृत्व सुरज पाटील यांनी साकारावे .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)