• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

जननी जन्मभूमिश्च  स्वर्गादपि गरियसी ||जननी जन्मभूमिश्च  स्वर्गादपि गरियसी ||

माणगंगा by माणगंगा
September 27, 2024
in Uncategorized
0
जननी जन्मभूमिश्च  स्वर्गादपि गरियसी ||जननी जन्मभूमिश्च  स्वर्गादपि गरियसी ||

जननी जन्मभूमिश्च  स्वर्गादपि गरियसी ||

ऐडवोकेट गिरीश राऊत यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: वाढवण बंदराबाबत स्थानिकांच्या फसवणुकीचे नवे अध्याय समोर  येत आहेत.

स्वामीपेक्षा स्वामीनिष्ठ असलेल्या गिरीश कुबेर या लोकसत्ताच्या संपादकाने नेहमीप्रमाणे या दैनिकाला कामाला लावले आहे.

कालच्या बातमीप्रमाणे, स्थानिक डायमेकर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची, बंदर प्रकल्पाच्या अध्यक्षांबरोबर बैठक झाली. या बैठकीत या डायमेकर्सना बंदराच्या गळाला लावण्यासाठी अनेक आश्वासने, प्रलोभने, आमिषे देण्यात आली.

परंतु सर्वांनी याबाबत ताबडतोब सावध होण्याची गरज आहे. मुळात या भागात दागिन्यांचे साचे बनवण्याचा, डायमेकिंग हा उद्योग – व्यवसाय स्वयंप्रेरणेने  विकसित करणारे ग्रामस्थ, हे खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहेत. त्यांच्या गावांतील घरात आणि पडवीत जपान, मध्यपूर्वेचे देश इत्यादींशी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहार करूनही, गावांच्या शांततामय जीवनाला आणि हिरव्यागार पर्यावरणाला धक्का न लावता अर्थार्जन करण्याची किमया त्यांनी साधली आहे.

ग्रामस्थांना या महाविनाश घडवणाऱ्या  बंदर प्रकल्पाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणारे, त्यांना हे सांगत नाहीत की, तुम्ही विस्थापित होणार आहात. तुमच्या घरा – गावांवर प्रकल्पाचा बुलडोझर फिरणार आहे.

माझ्या बांधवांनो, आपल्या शेकडो पिढ्यांना अंगाखांद्यावर खेळवणारा पालन पोषण करणारा  डहाणूचा समुद्र आणि डहाणूची शेती, या बंदराच्या  अनेक किलोमीटर्सच्या सुक्या – ओल्या गोद्यांच्या बांधकामात, रस्ते रेल्वेंच्या जाळ्यात, प्रचंड वेअरहाऊसच्या उभारणीत, कंटेनर्सच्या उलाढालीत, आगंतुकांच्या काॅलनीत आणि इतर अनेक विध्वंसक घडामोडीत पूर्ण उध्वस्त होणार आहे.

आपणच जेथे हाकलले जाणार आणि परागंदा होणार, तेथे कुठले डायमेकिंग? , कुठली शेती आणि कुठली मच्छीमारी? यांच्या भूलथापांना फसू नका. समुद्राजवळची शेकडो गावे, पाडे प्रत्यक्षरित्या आणि पूर्वेच्या डोंगररांगा, तेथील गावे बांधकाम साहित्यासाठी, अप्रत्यक्षरीत्या फेकली जाणार आहेत.

आपल्या आधीच्या पिढीने या प्रकल्पास का कसून विरोध केला, ते समजून घ्या. सर्वोच्च न्यायालयाने डहाणूच्या व त्याद्वारे देश आणि मानवजातीच्या रक्षणासाठी नेमलेल्या, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारींच्या अध्यक्षतेखालील डहाणू प्राधिकरणाने सोळा तारखांना सुनावण्या घेऊन, सांगोपांग चिकित्सा करून,  हा सर्व अभ्यासांनी नाकारलेला प्रकल्प, एकमताने फेटाळला आणि  येणाऱ्या पिढीचे व पुढील पिढ्यांचे रक्षण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याला काळिमा फासण्याचा नतद्रष्टपणा अत्यंत अनैतिक पध्दतीने केला जात आहे.

आपल्या स्वाभिमानाला व सत्वाला हे आव्हान आहे. कोणत्याही बतावणीला, आमिषाला बळी पडाल तर आपल्या मुला नातवंडांचा घात कराल. हा सत्याशी, निसर्गाशी, ईश्वराशी द्रोह ठरेल. आपल्याकडे सागरात शंखोदर आहे. त्याचं नातं श्रीरामाशी आहे अशी येथील श्रध्दा आहे. प्रभू श्रीरामांनी म्हटले होते,

अपि स्वर्णमयी लंका,
न मे लक्ष्मण रोचते |
जननी जन्मभूमिश्च
स्वर्गादपि गरियसी ||

लक्ष्मणा, जरी सोन्याची असली तरी लंका मला प्रिय नाही.

माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे.

आणि हा आपल्या डहाणूच्या मातृभूमीचा निसर्ग तर खरेच काल्पनिक स्वर्गापेक्षा सुंदर आहे. याचा मोबदला कशातही होऊ शकत नाही. बंदर प्रकल्प हा सोन्याच्या हरणाचे रूप घेतलेला मायावी मारिच राक्षस आहे. त्याच्या मोहात कुणी फसू नये.

Views: 103
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मी विधानसभा लढवणारच राजेंद्रअण्णा देशमुख

मी विधानसभा लढवणारच राजेंद्रअण्णा देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)