मी विधानसभा लढणारच, राजेंद्रअण्णा देशमुख…
1995 ची पुनरावृत्ती होते की काय ? याकडे जनतेच्या नजरा
आटपाडी प्रतिनिधी
नुकत्याच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघातून मी उमेदवारी लढवणारच असा निर्धार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आज पत्रकार शी बोलताना व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की आपण पाच वेळा विटेकरांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी 1995 ला मला पाठिंबा दिला व विजयी केले. परंतु आत्ता या वेळेला विटेकारांनी म्हणजेच पाटील व बाबर यांनी मला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी व्यक्त केली.
सन 1995 ला मी अपक्ष उमेदवार लढवणार अशी घोषणा केल्यानंतर मी दिल्लीमध्ये असताना स्वर्गीय नेते हनमंतराव पाटील यांनी माझ्या परस्परच सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मला पाठिंबा जाहीर केला होता .मी त्यांचे ऋण विसरलो नाही. तर माजी आमदार सदाभाऊ पाटील यांनाही विजयी करण्यात आमचा मोठा सिंहाचा वाटा आहे .
तसेच मी तालुक्याच्या वतीने विटेकरांना पाटील व बाबर यांना पाच वेळा पाठिंबा दिला होता व निवडून ही आणले होते याचे ऋण त्यांनी फेडावे व येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला त्यांनी सहकार्य करावे असेही या वेळेला माजी आमदार देशमुख म्हणाले.
1995 ला मी अपक्ष निवडून आल्यानंतर केवळ आणि केवळ टेंभूचे पाणी तालुक्याला मिळावे म्हणून युतीच्या शासनाला मी पाठिंबा दिला होता. आज बऱ्यापैकी तालुका ओलिताखाली आलेला आहे. अन्य काही गावांना थोड्याच दिवसात टेंभूचे पाणी येईल टेंभूच्या पाण्यासाठी मी आमदारकी पणाला लावली असून अनेक जण टेंभूचे नाव घेऊन स्वतःचा प्रचार करीत आहेत. परंतु टेंभूसाठी खरोखरच कोणी आमदारकी पणाला लावली हे जनतेला माहीत आहे.
केवळ आणि केवळ तालुक्यामध्ये सर्व गावात पाणी फिरावे ऊस वाढावा कारखाना चालावा या बाबीचा विचार करून तसेच शेतकऱ्यांची आर्थिक नाडी भक्कम व्हावी व त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण मिळावे इंजिनिअर डॉक्टर मुले व्हावीत या अपेक्षेने केवळ आणि केवळ टेंभूचे पाणी आटपाडी तालुक्याला मिळावे यासाठीच मी युतीच्या शासनाला पाठिंबा दिला होता.
1995 ला टेंभूची निर्मिती झाली. रोखे निघाले परंतु अद्याप तालुका ओलीताखाली आला नाही. केवळ आणि केवळ तालुका होलीचता खाली आणणे शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबवणे, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळणे, शेतकऱ्यांची आर्थिक नाडी मजबूत करणे या सर्व बाबींचा विचार करून मी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा माजी आमदार राजेंद्र राम देशमुख यांनी केली आहे.0~2Download