एक दिवस साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले आदिवासी पारधी समाजाचा कलंक पुषून काढतील असा मला विश्वास आहे ….आमदार .राहुल(दादा )कुल,
आज पाटस गाव येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला, नंतर तलाठी कार्यालय पाटस येथे आदिवासी मंत्रालयच्या वतीन देण्यात आलेल्या खावटी वाटप या कार्यक्रमात आध्यक्ष म्हणून दौंड तालुक्याचे
मा.आमदार, राहुल (दादा) कुल व प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या वेळी प्रमुख पाहुने म्हणून आदिवासी समाजसेवक व साहित्यिक श्री नामदेव ज्ञानदेव भोसले यांच्या उपस्थितीत खावटी वाटप करण्यात आले,
आदिवासी प्रकल्प घोडेगाव यांच्याकडून सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे,या चार जिल्हातील गरीब कुटुंबातील लोकांसाठी एकुण 13682 बाजाराचे किट वाटप करण्याचे आयोजित केले आहे ,
सदर त्या अनुषंगाने
आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे व अन्नधान्याचे किटचे वाटप करण्यात आले, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पाटस गावातील तलाठी व सरकल हाॅपीस येथे दौंड चे आमंदार राहुल (दादा)कुल व आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले. पि एस आय.नागरगोजे,नामदेव (नाना) शितोळे,डाॅ मधुकर आव्हाड
योगेश बाबा शितोळे, संभाजीराव खडके, यांच्या ऊपस्तीत आदिवासी पारधी गरीब कुटुंबातील लोकांना किट
वाटप करण्यात आले.
राहुल कुल म्हणाले की राज्यात कोरोणामुळे गरीबांची उपासमार होउ नाही, त्यामुळे गरीबांना खावटी अनुदान योजणे अतंर्गत खावटी वाटप केली जात आहे, परंतू शासनाणे वर्षातून एक किट देण्या एवजी दर महिन्याला एक द्यावे असी तरतूत शासनाने करावी तरच गरीबांना खरा न्याय मिळेल.
आज राज्यात आदिवासी पारधी कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून देण्यात नामदेव भोसले हे नेहमीच अग्रेसर असतात नामदेव भोसले हे एक दिवस आदिवासी पारधी समाजाचा कलंक पुसून काढतील असा मला विश्वास आहे ,आज आदिवासी साठी शासनाच्या अनेक योजना आहेत परंतू आपण एक पाऊल पुढे होऊन शासकीय योजनांचा लाब घेतला पाहीजे
ते पुढे म्हणालेकी गावातील गावपुढा-यानी आपल्या गरीबील पुढा-याना न्याय देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन आमदार राहुल दादा कुल यांनी केले…
या वेळी आमदार मा.राहुल कुल, साहित्यिक, नामदेव ज्ञानदेव भोसले.
डाॅ मधुकर आव्हाड, योगेंद्र शितोळे,नामदेव शितोळे,संभाजीराव खडके, दादासाहेब भंडलकर, केसकर पानसरे, जवंत शितोळे,संभाजी देशमुख, वसंत साळुंखे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, रामदास चव्हाण, माणिक चोरमले, बाबा कोळेकर ,विकास कोळपे, मंडल अधिकारी भोंडवे,भाऊसाहेब तलाठीपाटस, अभिजीत शितोळे, सतिश आव्हाड, विठ्ठल आव्हाड, आशोक पानसरे व आदिवासी कुटुंबातील लाभार्थी मोठ्या संख्येत ऊपस्थितीत होते, सदर कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी प्रकल्प घोडेगाव यांनी केले होते,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मधुकरराव आव्हाड यांनी केले, योगेंद्र बाबा शितोळे यांनी आभार मानले,







