बचेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयवंत भिसे यांची बिनविरोध निवड
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
माळशिरस तालुक्यातील बचेरी ग्रामपंचायतचे उपसरपंच महादेवराव बरकडे यांनी स्थानिक पातळीवर ठरल्याप्रमाणे राजीनामा दिलेने बचेरी ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच सौ राणी विश्वजीत गोरड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती
यावेळी उपसरपंच पदासाठी सदस्य जयवंत उर्फ नाना भारत भिसे यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता सदर अर्जाची छाननी होऊन उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आला यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून माळशिरस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील जाधव यांनी काम पाहिले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी बालम कोरबु उपस्थित होते यावेळी उपसरपंच निवडीसाठी जयवंत भारत भिसे उर्फ नाना भिसे यांचाच एकमेव अर्ज आल्यामुळे व छाननीत मंजूर झाला असल्याने बैठकीचे अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच सौ.राणी विश्वजीत गोरड यांनी उपसरपंच पदी जयवंत भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले
यावेळी ग्रामपंचायतीच्या अकरा सदस्यापैकी सरपंच सौ राणी गोरड,महादेव पाटील, महादेव बरकडे,मोहन शिकारे, जयवंत भिसे,पुजा थिटे हे सहा सदस्य उपस्थित होते तर उर्वरित पाच सदस्य गैरहजर राहिले निवडीनंतर गुलालाची उधळण करीत व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन नुतन उपसरपंच जयवंत भारत उर्फ नाना भिसे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी प्रा शंकर शिंदे,,सुदाम शिंदे, विश्वजीत गोरड,राजु गटकुळे,सोमनाथ गाडवे,सूधीर पाटील, सुनिल माने,नारायण खरात,वामन शिकारे,संभाजी शिंदे, नारायण शिंदे ,बाबुराव गोरड यांच्या सह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते
फोटो
उपसरपंच जयवंत भिसे यांना निवडीचे पत्र देताना निवडणूक निर्णयाधिकारी तथा सरपंच सौ. राणी गोरड, निवडणूक निरीक्षक विस्तार अधिकारी सुनील जाधव ग्रामसेवक बालन कोरबू माजी सरपंच सोमनाथ गाढवे महादेव पाटील प्रा. शंकर शिंदे विश्वजीत गोरड मोहन शिकारे पोलीस पाटील अण्णासाहेब शिकारे महादेव बरकडे राजू गटकुळे वामन शिकारे नारायण शिंदे बाबुराव गोरडआदी मान्यवर