भारती विद्यापीठाचे इंग्लिश मीडिअम स्कूल लोहगाव येथे स्नेहसंमेलनाचा जल्लोष…….
पुणे प्रतिनिधी कविता सवाखंडे.
भारती विद्यापीठ इंग्लिश मीडिअम स्कूल लोहगाव पुणे येथे “रिश्ते”
(A Celebration of Human Relations) स्नेहसंमेलन दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी अतिशय शिस्तबद्ध व जल्लोशात संपन्न झाले.
जीवनात नाती तशी बरीच असतात त्यांची जपणूक ही तेवढीच करावी लागते. भारती विद्यापीठाचे इंग्लिश मिडीयम स्कूल लोहगाव येथे शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यातील नात्यांची जपणूक नेहमीच केलेली आहे.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून ,”आपली नाती” ही संकल्पना अत्यंत सुंदर रित्या सादर करण्यात आली. याप्रसंगी प्रायमरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमातून नात्यांचा हा जल्लोष सादर केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल पराग मोडक, सुप्रसिद्ध लेखिका कल्याणी सरदेसाई व असिस्टंट डायरेक्टर शीतल टाक मॅडम हे उपस्थित होते. स्नेहसंमेलनाची सुरुवात भारतीय विद्यापीठाचे संस्थापक माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमापूजन आणि व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
याप्रसंगी कर्नल पराग मोडक यांनी आपले राष्ट्र, राष्ट्राचे नावलौकिक आणि आपला राष्ट्रध्वज तिरंगा या तीन गोष्टी याबाबत आपल्या मनामध्ये सतत प्रेम आणि आपुलकी जोपासण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी चांगला आणि गुणसंपन्न नागरिक बनावे कारण एक चांगला आणि गुणसंपन्न नागरिक होणे हीच आपली राष्ट्रसेवा असल्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पालकांशी संवाद साधताना ते पुढे असे म्हणाले की, पालकांनी आपली मते आपली स्वप्ने मुलांच्यावर न लादता मुलांना त्यांची स्वतःची स्वप्ने पाहणे व ती पूर्ण करणे यावर भर देणे बाबत कथन केले.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना माननीय सुप्रसिद्ध लेखिका कल्याणी सरदेसाई यांनी सध्याच्या यंत्र युगात आत्मिक सुख, शांती आणि समाधान याची प्राप्ती करण्याकरिता मानवी सुसंवाद आणि नातेसंबंध जपणे यास अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना भारती विद्यापीठाच्या असिस्टंट डायरेक्टर सन्माननीय शितल टाक मॅडम यांनी पालकांशी संवाद साधताना पालकांनी आपल्या मुलांच्या सोबत जेवण करावे, आपल्या पाल्याने दिवसभरामध्ये कोणकोणते काम केले त्याचा थोडक्यात आढावा घ्यावा कारण पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवादाचा अभाव आपणास दिसून येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आई आणि वडील मोबाईल मध्ये व्यस्त असल्यामुळे मुलांच्या सोबत वेळ घालवण्याकरिता पालकांच्याकडे वेळच शिल्लक नसून पालकांनी आपल्या वेळेची मुलांच्या मध्ये गुंतवणूक करणे बाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
शाळेचे मुख्याध्यापक माननीय जॉर्ज पी.एस.सर यांनी निसर्गाबरोबरच पालक विद्यार्थी शिक्षक आणि शाळा यांच्यातील नातेसंबंध मजबूत करून स्वावलंबी स्वयंपूर्ण आणि यशस्वी नागरिक घडवण्यामध्ये शिस्तबद्ध नियोजन कठोर परिश्रम आणि निर्णय क्षमता या तीन गोष्टी आधारस्तंभ असल्याचे मत व्यक्त केले.
स्नेहसंमेलनामध्ये इयत्ता पहिलीच्या मुलांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते आपल्या नृत्यातून अत्यंत सुंदर रीत्या सादर केले. इयत्ता पहिलीच्या मुलांनी शिक्षक विद्यार्थी यांच्यामधील नाते आपल्या नृत्यातून सादर केले. इयत्ता दुसरीच्या मुलांनी देव विठ्ठल व आजी-आजोबांशी असलेले आपले नाते नृत्यातून सादर करताना अक्षरशः डोळ्यातून पाणी आल्याचा प्रत्यय आला. इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सणांशी असलेले आपले नाते, इयत्ता पाचवीच्या मुलांनी देशाशी असणारे नाते, इयत्ता सहावीच्या मुलांनी प्राणिमात्रांशी असणारे नाते, इयत्ता सातवीच्या मुलांनी नदीशी असणारे नाते, इयत्ता आठवीच्या मुलांनी मैत्रीचे नाते तर इयत्ता नववीच्या मुलांनी बहीण भावांच्या नात्यावर नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना इयत्ता नववी व प्री प्रायमरी विद्यार्थ्यांचे नृत्य यांनी झाले.
याप्रसंगी सण २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विशेष गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये 91 टक्के गुण मिळवून प्रथम आलेली समीक्षा शिंदे, 90% गुण मिळवून द्विती आलेली समृद्धी जयवंत, 89 टक्के गुण मिळवून तिसरी आलेली तनवी डांगर यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर सण २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील बेस्ट हाऊस हा सन्मान पटकावलेल्या ऑरेंज हाऊस मधील विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्नेहसंमेलनाच्या या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सौ नीलिमा ढमढेरे मॅडम, सौ मिनाज पिरजादे मॅडम, मिस श्वेता गायके, मास्टर शौनक जाधव यांनी केले तर आभार मिस अमनदीप कौर यांनी मानले.
कार्यक्रमाकरिता संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.