महाराष्ट्र पोलिसांना दर महिन्याला सेमिनार व प्रोग्राम घेऊन , लोकांशी चांगली मदतपूर्ण वागणूक करण्याचे आदेश
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग (Human Rights Court) चा ऐतिहासिक निर्णय
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस नीट वागणुक देत नाही अशी सर्वसामान्यांची भिती आत्ता दुर होणार आहे, कारण डोंबिवलीतील एका युवकाने पोलीसाच्या असभ्य वागण्याबाबत राज्य मानवी हक्क आयोगाचे दरवाजे ठोठावल्यावर राज्य मानवी आयोगाने महाराष्ट्र पोलीसांना दर महीन्याला सेमिनार व प्रोगाम घेऊन लोकांशी चांगली व मदत पुर्ण वागणूक करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत.
डोंबिवलीत रहाणारा केवल विकमणी हा तरुण क्रिकेटचे टर्फ़ ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात असलेल्या शिवाजीनगर पोलीस स्टॆशनच्या हददीत चालवित होता. दि. २० मे २०२३ रोजी त्यांच्या टर्फ़मध्ये क्रिकेटचा सामना सुरु असताना शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुहास विठठल पाटील ह्यांनी पोलीस गाडीने आपल्या कर्मचा-यासह येऊन केवल विकमणीसह सर्व खेळांडुना घाणेरडया भाषेत शिवीगाळ करत, मारहाण करुन २०० उठा-बशा मारण्यास लावलेल्या होत्या, त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरलदेखील झाला होता. त्यापुर्वीदेखील केवल विकमणी ह्यांना मारहाण करुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाहीदेखील करण्यात आलेली होती, हफ़्ता न दिल्यामुळे मारहाण करुन चुकीची वागणूक दिली म्हणुन केवल विकमणी ह्यांनी शासनाच्या विविध विभागाकडे तक्रारी केलेल्या होत्या, त्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे केवल विकमणी ह्यांनी अधिवक्ता गणेश घोलप यांचेमार्फ़त राज्य मानवी ह्क्क आयोगाकडे तक्रार केलेली होती. त्या तक्रारीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तासह उल्हासनरचे डीसीपी व अंबरनाथचे एसीपी यांचेसह समर्थ पोलीस स्टेशन, पुणे येथे नियुक्तीस असलेले पोलीस उपनिरीक्षक सुहास विठठ्ल पाटील ह्यांना नोटीस काढुन शपथपत्र सादर करण्याचे निर्देश केलेले होते. सुनावणी दरम्यान राज्य मानवी हक्क आयोगाने व्हिडीओ चित्रीकरण, सुहास पाटील यांचेविरोधात झालेली कार्यवाही आदींचे अवलोकन करुन पोलीस उपनिरीक्षक सुहास विठठल पाटील ह्यांनी ६ आठवडयात केवल विकमणी ह्यांना ५ लाख रुपये नुकसान भरपाईपोटी देत त्यांचेविरोधात भादवि कलम ४४८ व इतर नुसार गुन्हा नोंदविण्याचे, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करत त्यांचेविरोधात दोषारोपपत्र सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना देत महाराष्ट्र पोलीसांना दर महीन्याला सेमिनार व प्रोगाम घेऊन लोकांशी चांगली व मदत पुर्ण वागणूक करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग (Human Rights Court) चा ऐतिहासिक निर्णय वकील ऍडव्होकेट श्री गणेश प्रभाकर घोलप तसेच तक्रारदार श्री. केवल विकमाणी यांना मोठा दिलासा….तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ येथील आरोपी-पोलीस पी.एस.आय. सुहास विठल पाटिल यांना कायदेशीर दणका
तक्रारदार केवल विकमाणी यांच्यावर अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस स्टेशन चे पी.एस.आय.सुहास विठल पाटील यांनी केलेल्या अमानुष मारहाण शिवीगाळ व अन्याय केला होता. तब्बल १.५ वर्षापूर्वी केवल विकमाणी यांच्यावर आरोपी पी.एस.आय. सुहास विठल पाटील यांनी प्रचंड अन्याय करत स्वतःच्या पदाचा गैर-वापर केला होता, त्या विरुद्ध १.५ वर्षापासून ठाणे पोलीस आयुक्त, उपायुक्त, एसीपी, वरिष्ठ पोलीस, मुख्यमंत्री व गृहमंत्री पर्यंत सर्वांकडे तक्रारी करत दाद मागूनही कुठेच न्याय मिळाला नसून सर्वांनी तक्रारदार केवल विकमाणी यांनाच उलटरित्या त्रास दिला.. तक्रारदार केवल विकमाणी यांनी त्यांचे वकील ऍडव्होकेट श्री गणेश प्रभाकर घोलप यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग (Human Rights Court) येथे लेखी तक्रार दाखल केली, या केस मधील तक्रारीची व पुराव्यांची गंभीर दखल कोर्टाने घेतली व केस फास्ट चालवून ७ महिन्यात तक्रारदार श्री. केवल विकमाणी यांना मोठा दिलासा दिला आहे व आरोपी पी.एस.आय. सुहास विठल पाटील यांना कायदेशीर दणका देऊन त्यांच्यावर पुढील कलमानुसार ऑर्डर केली आहे.
▶️आरोपी पी.एस.आय. सुहास विठल पाटील यांनी ५(पाच) लाख रुपये तक्रारदार श्री.केवल विकमाणी यांना ६ आठवड्यात द्यावे.
▶️आरोपी पी.एस.आय. सुहास विठल पाटील यांच्यावर
तक्रारदार श्री. केवल विकमाणी यांच्या जवाबनुसर गुन्हेगारी, मारहाण, शिवीगाळ, सरकारी पदाचा दुरुपयोग, गुन्हेगारी अतिक्रमण व इतर कलमानुसार गुन्हा FIR दाखल करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.
▶️संपूर्ण प्रकरण पुन्हा नव्याने चौकशी करून आरोपी- पोलीस पी.एस.आय.श्री सुहास विठल पाटील यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून रिपोर्ट सादर करावे.
▶️महाराष्ट्र पोलिसांना दर महिन्याला सेमिनार व प्रोग्राम घेऊन, लोकांशी चांगली मदतपूर्व वागणूक करण्याचे पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त ठाणे यांना दिले आहेत.
▶️सर्व योग्य कार्यवाही करून कोर्टात चार्जशीट दाखल करावी…….