आरे सुरक्षा रक्षक विलास पवार यांच्या आशीर्वादाने होत असलेली व झालेली बेकायदेशीर कामे निष्काशीत होऊन वंशावळ संपत्तीची चौकशी व्हावी व तात्काळ निलंबित करावे.
:- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) आरे वसाहतीचे सुरक्षा अधिकारी श्री. विलास पवारांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर कामांना ऊत आला आहे. त्यात प्रामुख्याने गट क्रमांक २ या ठिकाणी अनेक बेकायदेशीर झोपड्या स्थापित झाल्या असून अश्या चोर अधिकार्यास तात्काळ निलंबित करावे अशी मागणी समाजभूषण पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्री व आरे प्रशासणाला केली आहे.
गट क्रमांक ३ या ठिकाणी तबेल्याचे मालक श्री. खुराना यांनी ५००० हजार फुटाचा मोकळ्या जागेवर बेकायदेशीर बंगला बांधला आहे.
गट क्रमांक ८ याठिकाणी सुध्दा तबेल्या च्या बाजूला गेल्या वर्षा पासून अनेक बेकायदेशीर झोपड्या बांधल्या आहेत. ही सर्व शासनाच्या जागेवरील अतिक्रमने केवळ विलास पवार यांच्या आशीर्वादाने होत आहेत.
प्रत्येक बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमने होण्यास या अधिकाऱ्याने स्वतःचे आर्थिक हित जोपासले असून या प्रशासकीय चोरास (विलास पवार) लवकरात लवकर कडक शासन व्हावे यासाठी वंशावलं संपत्तीची चौकशी होऊन ती जप्त करावी तसेच बेकायदा कामे निष्कशीत व्हावीत शिवाय असे बांधकामे करवून घेणाऱ्यास कडक शासन करावे.
श्री. विलास पवार यांनी आरे परिसरात आपल्या पदाचा गैरवापर करून अनधिकृत कामांना प्रोत्साहन दिले असून अश्या अधिकाऱ्याचे तात्काळ नीलम्बन होणे अत्यावश्यक आसल्याचे डॉ माकणीकर म्हणाले.