सीबीएस न्युज मराठी कडून यंदा हि राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविणे आवाहन .पांडुरंग हातेकर
प्रतिनिधी – पांडुरंग हातेकर
प्रत्येक व्यक्ती ही जन्माला येतांनाच स्वतःचं वेगळं अस्तित्व घेऊन जन्मास आलेली असते. संबंध आयुष्यभर आपलं जीवन समाजासाठी सम्पर्पित करीत असते. त्याने/तीने आयुष्यभरात केलेल्या उत्तम कार्याची समाज नकळत दखल घेत असतो. असेच वेगळं आणि चाकोरी बाहेरील आपलं कार्य सिद्ध करणाऱ्या समाजशील व्यक्तिमत्वांचा गेल्या पाच वर्षापासून सीबीएस न्युज मराठी डिजिटल नेटवर्क महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यस्तरीय गुणगौरव व विविध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विविध क्षेत्रातील गुणवंतांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन सीबीएस न्युज मराठी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे .
सीबीएस न्यूज मराठी डिजिटल नेटवर्क महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय आदर्श सेवा रत्न पुरस्कार वितरण सोहळा व सहावा वर्धापन दिन महासंमेलन फेब्रुवारी २०२५ आयोजित करित आहे. या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील गुणवंतांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी राज्यातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका,अंगणवाडी सेविका व मदतनीस आशाताई यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, डॉक्टर ,नर्स ,वकील, पत्रकार, महावितरण कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, पोस्ट कर्मचारी ,अशा सर्व श्रेणीतील व संवर्गातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय ,सांस्कृतिक, नाट्य चित्रपट, क्षेत्रातील नामंवत सुप्रसिद्ध सेलिब्रिटी, व अनेक मान्यवर विचारवंत, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यात पुरस्कारार्थी विशेष गौरव चिन्ह, सन्मानचिन्ह, व मानाचा फेटा देऊन गौरवण्यात येणार आहे. हा सोहळा अतिशय अविस्मरणीय सुरेख देखणा व दिमाखदार भव्य दिव्य कार्यक्रम सांगोला शहरात संपन्न होणार आहे. विशेषतः राज्यस्तरीय पुरस्कारासाठी दिनांक ३० डिसेंबर २०२४ पर्यंत विहित नमुन्यात प्रस्ताव पाठवावा तसेच ९९२२५७०८९६ / ९८९०५७०८९६ या व्हाट्सएप नंबर वर पाठवावे .विशेषतः सीबीएस न्युज चा छापील प्रस्तावमध्ये संपूर्ण नाव, जन्मतारीख, संपूर्ण पत्ता, मो न, ईमेल आयडी, शैक्षणिक अर्हता, कोणत्या क्षेत्रासाठी प्रस्ताव सादर केला आहात?, आपण करीत असलेला व्यवसाय, आपण ज्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे
त्याच्या झेरॉक्स प्रती सोबत पाठवणे, यापूर्वी कोणते पुरस्कार मिळाले आहेत का? कोणता पुरस्कार पाहिजे क्रमांक अशी संपूर्ण माहिती ३०डिसेंबर २०२४ पर्यंत वेळेत पाठवावी. आपली निवड झाल्यास आपणास फोनद्वारे कळवले जाईल. दिनांक ३० डिसेंबर २०२४ आलेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. चार सदस्यीय समितीचा निर्णय अंतिम राहील.असे आवाहन सीबीएस न्युज मराठी डिजिटल नेटवर्क महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे .