भाजपच्या मुंबई प्रोटोकॉल सेक्रेटरीची ४२० गिरी
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांच्या अत्यंत जवळचा व विश्वासू सहकारी व मुंबई भाजपचा प्रोटोकॉल सेक्रेटरी याने असंख्य नागरिकांना लाखो रुपयांना गंडविल्याच्या तक्रारी ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (SIT) हाती आलेल्या आहेत.
भारतातील भाजपचे असंख्य बडे नेते हे मुंबईत येत असतात. या सर्व पाहुण्यांना एअरपोर्टवरून रिसिव्ह करणे, त्यांची शाही बडदास्त ठेवणे यासाठी मुंबई भाजपच्यावतीने अध्यक्ष आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी ३० नोव्हेंबर २०२४ रोजी राजशिष्टाचार विभागाच्या (protocol department) नियुक्त्या केल्या.
यात संतोष पांडे (Adv.Santosh Pandey) या भामट्यालाही मुंबई विभाग प्रमुखपदी (Mumbai Division Head) नेमले. हा पांडे पहिल्यापासून भाजपच्या नावावर लोकांना फसवित असे. त्यासंबंधी अनेक तक्रारी वरिष्ठांकडे जात होत्या, मात्र वरिष्ठांनी त्याला कायमच पाठीशी घातले होते.
स्प्राऊट्सला मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीतील आकाश रामपाल गागट यांनाही या भामट्या पांडेने असेच फसविले आहे. गागट यांचा शाळेतील मित्र विवेक वीरेंद्र सिंह याने गागट यांचा संतोष पांडे यांच्याशी परिचय करून दिला. परिचय करून देताना सांगितले की, “संतोष पांडे बहुत बड़ा बिझनेसमन है, इनके पास पैसा लगाओगे तो आपको अच्छा खासा मुनाफा होगा” मात्र त्यांना इन्कम टँक्सची अडचण आहे, त्यामुळे पैसे विवेक यांच्या खात्यात जमा करावे लागतील. मित्राच्या बोलण्यावर गागट यांचा त्वरित विश्वास बसला व त्यांनी विवेक सिंह यांच्या खात्यात ३ लाख ६२ हजार २७०० रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर पांडे यांच्याशी गागट यांचे बोलणेही झाले. संतोष पांडे यांनी गागट यांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांना काही महिन्यांनी काही रक्कम दिली व सांगितले की, धंद्यातील हा त्यांचा नफा (profit )आहे.
थोडीशी रक्कम नफा म्हणून मिळाल्याने गागट हे पांडे यांच्यावर प्रचंड खुश होते. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये विवेक सिंह यांनी सांगितले की, पांडे याचे दिल्लीतील भाजप नेते व सरकारी अधिकारी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत, ते तुला रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर किंवा State Bank of India (SBI) या बँकेत मॅनेजर पदावर नोकरीला लावून देऊ शकतात. यासाठी त्यांनी ३७ लाख रोख रुपयांची मागणी केली.
गागट यांनी ही रक्कम रोख स्वरूपात देण्यास नकार दिला. त्यामुळे विवेक सिंह यांनी त्यांच्या मित्र व नातेवाईकांची नावे व त्यांचे बँक डिटेल्स शेअर केले.त्यानुसार गागट यांनी विवेक वीरेंद्र विवेक सिंह, शैलेश सिंह, विष्णू वीरेंद्र सिंह, मंगेश वीरेंद्र सिंह, एम एस ट्रेडर्स, अनिल कुमार चव्हाण, धनंजय एस बरनवाल, सुमित शिंदे, अजित चौरसिया, अश्विनी, अमन चौरसिया, अभिषेक सिंह, मनोज सिंह, साई दुर्गा ट्रेडर्स यांच्या खात्यात एकूण ३६ लाख २१ हजार ६०० रुपये जमा केले. या सर्व जणांना त्यांच्या बॅंकेत पैसे जमा झाल्याची गागट यांनी त्यांना मोबाईलवर फोन करून खात्री करून घेतली. (यातील संतोष पांडे यांसह १३ जणांवर पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे.)
डिसेंबर २०२२ मध्ये गागट यांनी विवेक सिंह यांना नोकरीबाबत विचारले, तेव्हा विवेक सिंह यांनी गागट यांना Northan Railway मध्ये नोकरी मिळाल्याची रंगीत झेरॉक्स असलेली कागदपत्रे दिली. यातील कागपत्रांवर गागट यांचा फोटो, नियुक्तीबाबतचा मजकूर लिहिलेला होता. Bhartiy Rail, Indian Railway New Delhi असे बनावट स्टॅम्प लावलेले होते.
गागट यांनी ओरिजिनल कागदपत्रांबाबत सिंह याला विचारले असता, सिंह याने संबंधित ओरिजिनल कागपत्रे ही पांडे यांच्याकडेच जमा असल्याचे सांगितले. त्यानंतर गागट यांनी पुन्हा छेडले असता नोकरी लागेपर्यंतचा पगार देण्याचे कबूल केले. त्यानंतर सिंह यांनी मंगेश सिंह व विष्णू सिंह यांच्या बँक खात्यातून ४ लाख १ हजार ५०० रुपये रुपये ट्रान्सफर केले.
काही महिन्यांनी गागट यांनी सिंह व संतोष पांडे यांना नोकरीबाबत विचारले असता, त्यांनी फोन उचलणे बंद केले. त्याचवेळी गागट यांना कागदपत्रांविषयी संशय यायला लागला. त्यांनी ती कागदपत्रे तपासली असता, ती बनावट असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर गागट यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
सुरुवातीस विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. अखेर गागट यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मात्र न्यायालयाच्या आदेशाने सूत्र हालली व संतोष पांडे यांच्यासह वरील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पांडे यांच्यासह सर्व आरोपी हे मुंबईच्या वरळी येथील रहिवाशी आहेत.
पोलिसांनी या सर्व १३ आरोपींवर भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) १८६० नुसार विक्रोळी पोलीस स्थानकात ४२० (फसवणूक- cheating), ४६५ (जालसाजी- forgery), ४६८ (forgery for purpose of cheating), ४७१ (using as genuine a forged document or electronic record), ३४ (common intention) कलमे लावलेली आहेत. याप्रकरणी पोलीस इन्स्पेक्टर संदीप चंद्रकांत पाटील (Sandeep Chandrakant Patil, API ) हे अधिकारी तपास करीत आहेत. स्प्राऊट्सच्या प्रतिनिधीने त्यांना याबाबत असता, त्यांनी ‘पोलीस तपास चालू आहे’ असे उत्तर दिले.
याप्रकरणी पोलिसांवर आशिष शेलार यांचा मोठा दबाव आहे, त्यामुळे कारवाई करण्यावर पोलिसांना मर्यादा येत आहेत. न्यायालयाने आदेश दिला नसता, तर आतापर्यंत हे प्रकरण इतर प्रकारणांसारखेच मॅनेज झाले असते, अशी माहितीही स्प्राऊट्सच्या सूत्रांनी व्यक्त केलेली आहे.
पांडे याच्या हकालपट्टीची मागणी:
- संतोष पांडे हा आरोपी त्याच्या भाजपच्या पदाचा दुरुपयोग करीत आहे. त्याने यापूर्वीही असंख्य लोकांना फसवले आहे, मात्र नामदार आशिष शेलार यांच्या कथित दबावामुळे पीडित व्यक्ती तक्रार करण्यास घाबरत आहेत, गागट यांनी न्यायालयात धाव घेण्याची हिंमत दाखवली, त्यामुळेच या भामट्यांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिले, मात्र असे कित्येक घोटाळे या कथित गँगने केले, याची सखोल चौकशी व्हायला हवी.
- पांडे यांचे कारनामे दिवसेंदिवस वाढतच आहे. विक्रोळीतील हे प्रकरण एक हिमनगाचे टोक आहे. अशी असंख्य प्रकरणे यापूर्वीही दाबण्यात आल्याची माहिती ‘स्प्राऊट्स’कडे आलेली आहे.
- पांडे व त्याच्या टोळीमुळे भाजपची उरलीसुरली प्रतिमाही मलीन होत आहे, त्यामुळे त्याची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही स्प्राऊट्ससह पीडित व भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठांकडे केली आहे.
सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी