सांगोला तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने सांगोला मार्केट कमिटी यांना देण्यात आले.तुरीचा सध्याचा हमीभाव7 750 /-असून कोणत्याही कडधान्यांचे दर हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करू नये. आणि हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करणे ,आणि हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्या आडते व व्यापाऱ्यांचे तात्काळ लायसन रद्द केले जावे. तसेच सांगोला शहरात आणि मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालातून कसलेही आडत, कडता वसूल केला जाऊ नये. अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.अशाप्रकारे मार्केट कमिटी सांगोला यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्यसरचिटणीस बाळासाहेब वाळके शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष एडवोकेट विशाल भोसले, इत्यादी शेतकरी उपस्थित होते एडवोकेट अभिषेक भोसले, नामदेव जानकर, चंद्रकांत बाबा खरात, बजरंग पारसे ,नवनाथ भोसले इत्यादी शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पण त्यांच्या शेतीमालातून आडत,कडता. वजा केल्यास पट्ट्या. जपून ठेवाव्यात ,व शेतकरी संघटनेकडे तक्रार करावी.