बोपगाव येथे गंगाराम जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहीत्य व खाऊवाटप कार्यक्रम संपन्न
पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोपगाव येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मुलांना साहीत्य खाऊवाटप कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी बोपगावच्या सरपंच ज्योती फडतरे , डेक्कन को आॅपरेटीव्ह बँकेचे संचालक दयानंद फडतरे , युवानेते संभाजी फडतरे, गराडे गावचे ग्रामपंचायत सदस्य समीर तरवडे , विजय जगदाळे तसेच तानाजी फडतरे , अॅडव्हाकेट दत्ताञय फडतरे,लक्ष्मण महादेव फडतरे .सोपान आश्रु फडतरे ,सोनबा फडतरे ,मारुती विठ्ठल फडतरे , समाधान भोसले , कुंडलिक फडतरे , गोरख नारायण फडतरे , बाळासो फडतरे , लक्ष्मण फडतरे , भाऊसो फडतरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गंगाराम जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाउवाटप व शालेय साहीत्यांचे वाटप करण्यात आले. मान्यवर विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने जगदाळे यांना पुढिल वाढचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
जिल्हा परिषद शाळा , माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक , वाडीवरिल शिक्षक -शिक्षिका ,अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
श्री सदगुरु कानिफनाथ माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हापरिषद प्राथमिक शाळा रायतेवस्ती ,नवनाथवाडी , गणेशवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.