बाळशास्त्रींचा, आदर्श सर्वानी घ्यावा . – विक्रमसिंह बांदल.
आटपाडी ( प्रतिनिधी )
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून सर्व समाजाला दिशा देण्या बरोबरच सच्चाईचा आरसा दाखविण्याचे काम केले आहे . हा आदर्श सर्वांनी अंगिकारावा, असे आवाहन खानापूर – आटपाडीचे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी केले आहे .
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंतीदिन तथा मराठी पत्रकार दिन म्हणून आज इलेक्ट्रॉनिक्स मिडिया च्या पत्रकारांनी सर्व समाज घटकांना एकत्र आणून साजरा केला . त्यावेळी विक्रमसिंह बांदल बोलत होते .
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पुजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले . स्वागत प्रास्ताविक पत्रकार अंकुश मुढे यांनी केले . अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, जिल्हा बॅक संचालक तानाजीराव पाटील, जि . प . समाजकल्याणचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, वैभवदादा पाटील, अनुकमे हणमंतराव देशमुख, सादिक खाटीक, अनिताताई पाटील, काँग्रेस आय चे नेते डी . एम पाटील सर, जयवंत सरगर, विनायक पाटील, दत्तात्रय पाटील, मनोज नांगरे, फिरोज मुलाणी, प्रभाकर नांगरे, डॉ . तुषार पवार, अश्विन उर्फ बंडू नांगरे, मंगेश हजारे, प्रेम नाईकनवरे, सुनिल लेंगरे, तालुका विधी सेवा समितीचे ॲड . सचिन सातपुते, आटपाडी भुषण पुरस्काराचे मानकरी अनुकमे सोपान काळे , ज्योतीराम काटकर, सुनीता माळी, अभिजीत माळी, प्रा. सदाशिव मोरे, संतोष ऐवळे यांच्यासह ज्येष्ट वृत्तपत्र विक्रेते अशोक गायकवाड शेटफळे, मारुती रोकडे करगणी, नागराज वाघमारे दिघंची, ज्येष्ठ पत्रकार म्हणून सन्मानित झालेले बंडोपंत देशमुख, सादिक खाटीक, महादेव लांडगे, कांतीलाल कारळे, इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया आटपाडीचे उपाध्यक्ष हबीब मुलाणी सचिव अशोक पवार, राजू शेख, लक्ष्मण खटके, नंदकुमार विभुते, मोहन पुजारी, अक्षय गायकवाड, अंकुश मुढे, तुकाराम गिड्डे, संतोष रणदिवे इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
आटपाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यकर्ते, पत्रकारांनी एकत्र यावे . अशी माझ्यासारख्याची भावना आहे . सादिकभाई सारख्या ज्येष्ट पत्रकारांनी सर्वपक्षीय राजकारणी मंडळी, सर्व पत्रकार यांचा समन्वय साधत आटपाडी तालुक्याच्या व्हीजन साठी सर्वांना एकत्र आणावे . सामुदायीक ताकदीने प्रश्न समस्या मार्गी लावूया . एकमेकांच्या विकास कामात अडथळे आणण्याच्या आणि एकमेकांच्या जिरवण्याच्या वृत्तीला सर्वांनी मुठमाती देवू या . पत्रकारांनीही परस्पर वेगळी चुल न मांडता एकत्रितपणे असे उपक्रम साजरे करावेत . ज्यायोगे सर्वांना सोयीचे होईल अशा भावना जि . प . चे समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी यावेळी पत्रकारांना शुभेच्छा देताना व्यक्त केल्या .
राजकारणी मंडळी, शासकीय अधिकारी किंवा समाजातील अन्य घटक यांच्या संदर्भातील पत्रक – निवेदना वरून एकतर्फी बातम्या न देता अशा आक्षेपार्ह बदनामीकारक बातम्यांची शहानिशा करूनच पत्रकारांनी आपले लेखणीचे शस्त्र चालवावे. उथळ बातम्यांच्या माध्यमातून एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी . समाजाला दिशा देणारी, विकासाला चालणा देणारी आणि नव नवीन प्रश्नांना उपस्थित करणारी पत्रकारीता सध्याच्या काळात आवश्यक आहे . सादिक खाटीक हे अनेक लेखांच्या माध्यमातून महिन्या दोन महिन्यातून मोठी खळबळ माजवून देतात . सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे लिखाण सादिक खाटीक यांनी दर आठवड्याला करावे . पत्रकारांनी डोळस, व्यासंगी आणि सर्वांविषयी आस्था ठेवून वाटचाल करावी . राज्यकर्त्याबरोबर पत्रकारही निस्वार्थपणे समाजसेवाच करतात . सर्वच पत्रकारांना नेहमीच सहकार्य करीत आलो आहे. यापुढेही सहकार्य राहीलच अशा शब्दात सांगली जि . म . स . बँकेचे संचालक आणि शिवसेना शिंदे गटाचे खानापूर – आटपाडी मतदारसंघाचे नेते तानाजीराव पाटील सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या .
आटपाडी तालुक्यातील पत्रकारीतेला मोठी पार्श्वभूमी आहे . दर्शनेदादा, रंगलाल कलाल सर , प्रभाकरकाका भंडारे, रावसाहेबकाका पाटील बंडोपंतदादा देशमुख, या आमच्या बालपणी पत्रकारीता केलेल्या पासून आमच्या वेळच्या माझ्यासह ( सादिक खाटीक ), शाम देशपांडे, कुमारसिंह राजेभोसले, चैतन्य पैठणकर, सतिश भिंगे इत्यादींच्या पत्रकारीतेने आटपाडी तालुक्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य दिले होते . राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजणारे माझे मित्र, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आपणा सर्वांचा आदर्श आहेत . सर्वसामान्य, उपेक्षित, वंचित, विकलांग, मागास, इत्यादी दुर्लक्षीत समाज घटकांसाठी या व्यासपीठाचा आम्ही पुरेपूर प्रचंड वापर केला . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ . भारत पाटणकर यांच्या, शेतीच्या पाण्याच्या आटपाडीत सुरू झालेल्या चळवळीचे आम्ही पत्रकार मुळ आहोत . पाया आहोत . याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे . पावसाळ्यात नद्यांच्या महापुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना उचलून द्या यासाठी सर्वप्रथम आंदोलन करणारे आम्ही आटपाडीकर पत्रकारच होतो . असा उल्लेख करत ज्येष्ट पत्रकार तथा कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र आत्म्यास अभिवादन करत पत्रकारांसह सर्वांना शुभेच्छा दिल्या .
आटपाडी तालुक्यातील प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या सर्व पत्रकारांनी आणि सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींनी आटपाडी तालुक्याच्या सर्वांगीण, चौफेर आणि लक्षवेधी विकासावरच प्रथम प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. *आटपाडीतून रेल्वे ये – जा करावी,* हे शतकापासून पहात आलेलो स्वप्न असो, दो आँखे बारह हाथ, या जगविख्यात चित्रपटाच्या कथानकाची कारण ठरलेली ८० वर्षापासूनची उपेक्षित *स्वतंत्रपुरच्या कैद्याच्या वसाहतीचा* आधुनिकी करणाचा प्रश्न असो किंवा भला मोठा पावणेतीन टी . एम . सी . चा तलाव आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी गावात. या तलावाचे नाव मात्र शेजारच्या जिल्यातल्या माण तालुक्यातल्या *म्हसवड गावाचे* . या तलावाच्या कामकाजाचे ठिकाण १०० किमी अंतरावरील सातारा जिल्ह्यातल्या फलटणला . आणि या तलावाचे बहुतांश पाणी मात्र शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला, पंढरपूर तालुक्याला . हा प्रचंड विसंगतीचा शतकापासूनचा आटपाडी तालुक्यावरील अन्याय थांबला पाहीजे . राजेवाडीतल्या *म्हसवड तलावाचे* नामकरण *राजेवाडी तलाव* झाले पाहीजे . तलावाच्या कामकाजाचे ठिकाण *फलटण* बंद होवून ते *आटपाडीतून* सुरू झाले पाहीजे . या तलावाचा गाळ काढून बहुतांश पाणी *तलाव जोड प्रकल्पाद्वारे* संपूर्ण आटपाडी तालुका भर फिरवत अन्य तालुक्यात नेले पाहीजे. *राजेवाडी तलाव बारमाही वाहता होण्यासाठी* नीरा नदीचे पाणी राजेवाडी सातत्याने तलावात सोडले पाहीजे. अशा *असंख्य महत्वपूर्ण प्रश्नांवर* आटपाडी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी लक्षवेधी आवाज उठवावा . *विकसनशील तालुक्यांच्या ५० वर्षे मागे पडलेला आटपाडी तालुका येत्या दशकात सर्वांच्या पुढे ५० वर्षे गेला पाहीजे.* इतका प्रचंड विकास होण्यासाठी आटपाडी तालुक्यातील सर्वच पक्षाच्या नेते मंडळीनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करावेत अशी प्रांजळ अपेक्षाही सादिक खाटीक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली .
डॉ . बाबासाहेब आंबेडकर बचत भवन मधील ध्वनी व्यवस्था आणि वर लटकत असलेले विकलांग अवस्थेतले अनेक पंखे आटपाडी तालुक्याच्या विकासाचे धिंडवडे काढत आहेत . अधिकारी महोदयांनी तात्काळ यावर उपाय योजना करावी, असा सल्ला देत राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हणमंतराव देशमुख यांनी आटपाडी तालुक्याच्या पत्रकारीतेचा गौरव करत पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परशुराम पवार यांनी केले . तर आभार हाबीब मुलाणी यांनी मानले .