मेंढपाळ व माथाडी कामगराची पोरगी सुप्रिया पाटीलची करागृह पोलीस पदी निवड…ग्रामस्थांच्या वतीने मिरवणूक व सन्मान
माणगंगा न्युज
आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील तर खटाव माण व आटपाडी तालुक्याच्या सरहदीवरील तसेच सातारा व सांगली जिल्ह्याच्या सरहदीवरील विभूतवाडी गाव वसलेले असून या गावची सर्वसाधारण तीन हजार लोकसंख्या असून, गावाला दुष्काळ हा पाचवीला पुजलेला आहे.
अशा या दुष्काळ परिस्थितीमध्ये अनेक तरुण कसे बसे जीवन जगतात ,तर काही तरुण मुंबईला पोटाची खळगी भरण्यासाठी जातात.
अशा मध्येच गावचे सुपुत्र महादेव पांडुरंग पाटील हे त्यांचे आजोळ कुरुंदवाडी येथे पूर्वी राहत होते. तेथे मेंढपाळ व्यवसाय करत होते. त्यानंतर काही दिवसानंतर मुंबईमध्ये माथाडीत त्यांनी जागा घेतली व माथाडी कामगार म्हणून काम करू लागले.
तर त्याच्यावर आपली उपजीविका भागवू लागले अशामध्येच त्यांच्या मुलांचे शिक्षण व त्यांचा घरचा रोजच्या उपजीविकेला लागणारे खर्च कसाबसा भागत असे.
त्यातच त्यांनी त्यांची कन्या कु .सुप्रिया हिला चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिले हलाकीची परिस्थिती असताना सुद्धा तिच्या इच्छेनुसार तिला शिकण्याची संधी महादेव पाटील यांनी दिली.
घरची हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा त्या मुलगी जिद्दीने शिकली व आज पोलीस दलामध्ये मुंबई कारागृह पोलीस म्हणून तिची निवड झाली .या निवडीने संपूर्ण गावात त्या मुलीचे व आई-वडिलांचे ग्रामस्थांनी स्वागत व कौतुक केले.
तर लोकनियुक्त सरपंच सुरज पाटील यांनी सुप्रियाची हलगीच्या निनादात गावातून मिरवणूक काढली.त्यानंतर सुप्रियाचा गावच्या वतीने सन्मान करण्यात आला या वेळेला साध्य फाउंडेशनच्या अध्यक्ष विद्याताई मोटे , आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे , मुख्याध्यापक गोरख जावीर, सेवानिवृत्त शिक्षक खाशाबा पावणे, सरपंच सूरज पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच सुप्रिया पाटील यांनी तिच्या जीवनात आलेले अनुभव बोलताना नमूद केले. तर माझ्याप्रमाणेच इतर मुलींनीही स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यावा असेही विचार या वेळेला कु.सुप्रिया पाटील यांनी मांडले.







