• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, October 25, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

त-हाडी येथे नियमित कर भरणाऱ्याना ठेंगा,आणि थकबाकीदारांना सवलत कितपत योग्य; – भुषण माधव बागुल

माणगंगा by माणगंगा
December 1, 2025
in Uncategorized
0
त-हाडी येथे नियमित कर भरणाऱ्याना ठेंगा,आणि थकबाकीदारांना सवलत कितपत योग्य; – भुषण माधव बागुल

त-हाडी येथे नियमित कर भरणाऱ्याना ठेंगा,आणि थकबाकीदारांना सवलत कितपत योग्य; – भुषण माधव बागुल

त-हाडी प्रतिनिधी

त-हाडी; महाराष्ट्रात व जिल्हयातील ग्रामपंचायतीच्या कर थकबाकी दारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीना त्यांच्या हददीतील निवासी मालमत्ता कर थक बाकीवर एकरकमी वसुलीसाठी-५० टक्के सवलत देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पण हा अधिकार कितपत योग्य आहे अशा सवाल सुप्रसिद्ध युवानेते भुषण माधव बागुल यांनी व्यक्त केला आहे.

थकबाकीदार नागरिकांच्या हिताचा महत्वपूर्ण निर्णयअसला तरी जे नागरिक नियमित कर भरणा करतात त्यांना या सवलतीचा काय फायदा ? नियमित करभरणा करून आम्ही गुन्हा केला का?जर शेतकऱ्यांचे ह्या वर्षी नुकसान झाले असेल तर ह्या वर्षाच्या करात सूट देणे प्राधान्याने गरजेचे होते. त्यामुळे नियमित कर भरणाऱ्यांसाठी देखील किमान एक वर्षाच्या करात सवलत मिळायला पाहिजे अशी मागणी भुषण माधव बागुल व नियमित करभरणाधारक करीत आहेत.


मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वागिण विकासासाठी तथा राज्यातील ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीला वेग देण्यासाठी शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. यामध्ये थकबाकीदाराना विविध करांमध्ये ५० टक्के करसवलत दिलेलीआहे. थकबाकीदारांसाठी हा महत्वाचा निर्णय मानला जातो. ग्रामपंचायतीला विविध करातून उत्पन्न मिळत असते. कर भरणारे दोन प्रकारचे ग्राहक असतात. एकनियमित करभरणा करणारे ग्राहक व एक थकबाकीदार ग्राहक आहेत. ग्रामपंचायतीमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे थकबाकी धाराची संख्येत वाढ होऊन थकबाकी करोडो च्या घरात गेलेलीआहे. त-हाडी ग्राम पंचायतीची थकबाकी करोडो रुपये आहे. थकबाकीची रक्कम दिवसे-दिवस वाढत असल्याची कारणे शोधणे गरजेचे असतांना उलट शासनच थक बाकीदाराना प्रोत्साहन देत आहे?

जो नियमित कर भरतो त्याला कुठलीच सवलत न देता जो कर भरत नाही त्याला सवलत देणे कितपत योग्य आहे.शिरपुर तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतीने अभियानात सहभाग नोंदवून करसवलत देणे सुरू केलेलेआहे. मात्र नियमित कर भरणाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. ही सवलत जाहीर झाल्यापासून नियमित कर भरणाऱ्यांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे आपणही थकबाकीदार होवू आणि पुढील वर्षी या सवलतीचा लाभ मिळवू? असे नियमिक कर धारकांनी मनोमन ठरविले आहे. त्यांचा विरोध थकबाकीदाराच्या करसवलतीला नाही.

आम्ही नियमित कर भरून एकप्रकारे ग्रामपंचायतीला मदतीचा हात देत आहोत. तरआम्हाला ग्राम पंचायतीने सवलत दिली पाहिजे. असे त्यांचे म्हणणे आहे. याकडे वरिष्ठांनीही गांभीर्याने पाहिले पाहिजे. असा नाराजीचा सुर नियमित कर भरणाऱ्यांमध्ये दिसून आला. यानंतर आम्ही थकबाकीदार होऊन सवलत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या करसवलत निर्णया मुळे पुढील वर्षी नियमित कर भरणा करणारे ग्राहक राहणारच नाही. असे मत नियमित कर धारकानी मांडलेले आहे.

▪️ कितपत योग्य? नियमित करभरणा करणाऱ्यांवर कठोर अन्याय?

“मी माझा स्वतःचा उद्योग व्यवसाय करून उपजिवीका चालवितो. साधारण दरवर्षी दिवाळीच्या अगोदर ग्रामपंचायतीचे कर्मचारी माझ्याकडे कर मागणीसाठी येतात. दिवाळीच्या सणानिमित्त कर्मचाऱ्यांचे पगार देणेसाठीचे कारण सांगून ते दरवर्षी माझ्याकडून संपूर्ण कर भरणा करून घेतात. आजपर्यंत नियमित कर भरणा करीत आलो.

थकबाकीदारासाठी ग्राम पंचायतीने-५० टक्के करसवलत देण्याचे जाहीर केले. ही सवलत नियमित करभरणा करणाऱ्यासाठी पाहीजे होती. कारण नियमित कर भरणारे ग्रामपंचायतीला खरे मदत करणारे आहेत. त्यांच्यासाठी सवलत देणे सोडून थक बाकी धारकांना सवलत देणे कितपत योग्य आहे? थकबाकीदारांना सवलत द्या त्या बरोबर नियमित करभरणा करणाऱ्यांना सुद्धा किमान एका वर्षासाठी सवलत द्यावी असे माझे प्रामाणिक मत आहे.”

भुषण माधव बागुल तथा सामाजिक कार्यकर्ते, त-हाडी ता. शिरपूर जि धुळे

Views: 125
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेयेथील विद्यार्थ्यांची मिरवणूक

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेयेथील विद्यार्थ्यांची मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)