• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शेती नाही… तरी पीक कर्ज अन् कर्जमाफी; मग खऱ्या शेतकऱ्यांना न्याय कधी ? पीक कर्ज वितरणातील कथित गैरप्रकारांमुळे संताप; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

माणगंगा by माणगंगा
July 30, 2026
in Uncategorized
0
सचिवाने स्वतःच्याच नावावर घेतले पीककर्ज; कर्जमाफीतही नाव, शेतकऱ्यांत संताप…..

शेती नाही… तरी पीक कर्ज अन् कर्जमाफी; मग खऱ्या शेतकऱ्यांना न्याय कधी ? पीक कर्ज वितरणातील कथित गैरप्रकारांमुळे संताप; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

आटपाडी तालुक्यात पीक कर्ज वितरण आणि कर्जमाफी प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. काही ठिकाणी शेतीच नसलेल्या व्यक्तींना पीक कर्ज मंजूर होऊन त्यांना कर्जमाफीचाही लाभ मिळाल्याचे आरोप होत असताना, प्रत्यक्षात शेती असलेल्या अनेक पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी विकास सोसायट्या आणि बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

या प्रकारामुळे संपूर्ण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पीक कर्ज योजना ही शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक आधार देण्यासाठी राबविली जाते. मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी नियमांना हरताळ फासून अपात्र व्यक्तींना कर्ज मंजूर झाल्याची चर्चा असून, त्याच कर्जाची शासनाकडून माफीही झाल्याचे बोलले जात आहे.

याउलट, सातबारा, आधार, बँक खाते आणि इतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही अनेक पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.वेळेत पीक कर्ज न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून जादा व्याजाने पैसे उचलावे लागत आहेत.

त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असून शेती आर्थिक संकटात सापडत आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळतो, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.शेतकरी संघटनांनी संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

जमीन नसताना पीक कर्ज कसे मंजूर झाले, कर्जमाफीचा लाभ कोणत्या निकषांवर देण्यात आला, तसेच या प्रक्रियेत कोणत्या अधिकारी किंवा संस्थांची भूमिका होती, याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांचा थेट सवाल”ज्याच्याकडे शेतीच नाही त्याला पीक कर्ज आणि कर्जमाफी मिळते, पण प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्याला कर्जासाठी दारोदार फिरावे लागते. मग शासनाची व्यवस्था नेमकी कोणासाठी?”

असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.मुख्य मागण्यापीक कर्ज वितरणातील सर्व संशयास्पद प्रकरणांची चौकशी करावी.अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करून जबाबदारांवर कारवाई करावी.पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता आणून भविष्यातील गैरप्रकारांना आळा घालावा.

Views: 81
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
वाघाच्या अस्तित्वाचे जंगलाच्या संतुलनात मोठे स्थान – रामदास घावटे चितळीतील नवमहाराष्ट्र विद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन,गुरुपौर्णिमा उत्साहात!

वाघाच्या अस्तित्वाचे जंगलाच्या संतुलनात मोठे स्थान - रामदास घावटे चितळीतील नवमहाराष्ट्र विद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन,गुरुपौर्णिमा उत्साहात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)