सौ. शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विद्यालयात उत्साहात वृक्षारोपण संपन्न!
मायणी :- प्रतिनिधी चितळी ता.खटाव येथील नवमहाराष्ट्र विद्यालयात स्व.सौ. शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयात अत्यंत उत्साहात वृक्षारोपण समारोह आयोजित करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला शाळा परिसरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती लाभली होती.या कार्यक्रमाची सुरुवात स्व. शुभांगीताई गावडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यालय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
पर्यावरण सौंदर्यात भर घालणारी शोभिवंत झाडे लावण्यात आली.या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक हांगे सर,पाटील सर,सौ. माळवे मॅडम,सौ. हांगे मॅडम,श्री. जाधव सर,श्रीमती धोंगडे मॅडम,सौ. कोळी मॅडम, कोळेकर सर,श्रीमती गोसावी मॅडम,श्रीमती धेंडे मॅडम, लेखनिक सौ. निकम मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी राजे, सूर्यवंशी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. पाटील सर यांनी केले, तर उपस्थितांचे श्रीमती धेंडे मॅडम यांनी आभार मानले. सौ. शुभांगीताई गावडे यांच्या स्मृतींना उजाळा देत आणि हरित वसुंधरेचा संदेश देत हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.


