*रविवारी २ ऑगस्टला झरे येथे एकदिवसीय साहित्य संमेलन*
रविवारी २ ऑगस्टला आटपाडी तालुक्यातील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे एकदिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .
हे संमेलन आटपाडी तालुका साहित्य मंच , खानापूर – कडेगाव तालुका साहित्य परिषद व झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे . या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध समिक्षक व मायणी कॉलेजचे *माजी प्राचार्य प्रा . डॉ . सयाजीराजे मोकाशी* आहेत .
कवी *सुनील जवंजाळ* यांची काव्यसंमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू ॲड . सुभाषबापू पाटील यांच्याहस्ते या दिवशी सकाळी ग्रंथपुजनाने संमेलनाचे उद्घाटन होणार आहे .
या संमेलनात पुस्तक परिचय या कार्यक्रमात गझलकार सुधाकर इनामदार यांच्या ” मी चंदन व्हाया बघतो ” . या पुस्तकावर प्रा . विश्वनाथ गायकवाड आपले विचार व्यक्त करणार आहेत . जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांच्या ” बनगी आणि बिरमुटं ” . या कथासंग्रहावर प्रा . डॉ अरुण कांबळे बनपुरीकर बोलणार आहेत . प्रा . साहेबराव चवरे यांच्या ” वानुळा ” या पुस्तकावर प्रा . श्रीकृष्ण पडळकर आपले विचार व्यक्त करणार आहेत . जयसिंग देशमुख यांच्या ” माझ्या लेकी ” . या पुस्तकावर प्रा . डॉ . विजय शिंदे आपले विचार व्यक्त करणार आहेत . प्रा . डॉ . सयाजीराजे मोकाशी यांचे अध्यक्षीय भाषण व कथाकथनकार *जीवन सावंत यांचे विनोदी मनोरंजन हे संमेलनाचे आकर्षण ठरणार आहे . कवी *सुनील जवंजाळ* यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार आहे . यामध्ये आटपाडी , खानापूर, कडेगाव ‘ माण व सांगोला तालुक्यातील कवी साहित्यिक सहभागी होणार आहे .
तरी साहित्यप्रेमींनी या संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन झरे पंचक्रोशी विद्यालय झरेचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा . साहेबराव चवरे, आटपाडी तालुका साहित्य मंचाचे अध्यक्ष सुनील दबडे , मंचाचे सचीव सुधाकर इनामदार यांनी केले आहे .


