• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

विकास सोसायटी सचिवांच्या चुकीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती; चौकशीची मागणी.,दोषी सचिवांवर कारवाई करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या – मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड

माणगंगा by माणगंगा
July 31, 2026
in Uncategorized
0
विकास सोसायटी सचिवांच्या चुकीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती; चौकशीची मागणी.,दोषी सचिवांवर कारवाई करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या – मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड

विकास सोसायटी सचिवांच्या चुकीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती; चौकशीची मागणी.,दोषी सचिवांवर कारवाई करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या – मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड

माणगंगा न्युज वृत्तसेवा, आटपाडी

आटपाडी तालुक्यातील काही विकास सोसायट्यांमधील सचिवांच्या निष्काळजीपणा, चुकीच्या नोंदी आणि माहिती अद्ययावत करण्यात झालेल्या त्रुटींमुळे अनेक पात्र शेतकरी चालू कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आरोप मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी सचिवांवर कायदेशीर कारवाई करावी व वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गायकवाड यांनी म्हटले आहे की, सन 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनांमध्ये अनेक पात्र शेतकरी विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिले. त्यांच्या मते, काही ठिकाणी सचिवांनी कर्ज खात्यांच्या नोंदी, पीककर्जाचा तपशील आणि ऑनलाइन माहिती योग्य वेळी अद्ययावत न केल्याने अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

आता चालू कर्जमाफी प्रक्रियेतही अशाच प्रकारच्या त्रुटी होत असल्याची माहिती मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना पीककर्जाची गरज असते. मात्र कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यास आणि जुन्या कर्जाची नोंद कायम राहिल्यास अनेक शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

त्यामुळे संबंधित प्रकरणांची फेरपडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याची आवश्यकता असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.जिल्हा उपनिबंधक, सहकार विभाग आणि संबंधित यंत्रणेमार्फत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. चौकशीत जर कोणत्याही सचिवांचा निष्काळजीपणा अथवा नियमभंग आढळून आला, तर संबंधितांवर कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गायकवाड यांनी पुढे म्हटले आहे की, सन 2017 व 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे सध्याच्या कर्जमाफी यादीतही दिसत नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांकडे थकबाकी नसल्याचे अधिकृत प्रमाणपत्र विकास सोसायटीने द्यावे किंवा ते थकबाकीदार असल्यास त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा. यापैकी कोणताही पर्याय स्वीकारून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया – “सन 2017 आणि 2019 मधील कर्जमाफीत अनेक पात्र शेतकरी वंचित राहिल्याच्या तक्रारी होत्या. आता चालू कर्जमाफीतही अशाच प्रकारे शेतकरी वगळले जात असल्याची माहिती मिळत आहे. पात्र शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच जाणूनबुजून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जात असल्याचे आढळल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”प्रकाश गायकवाड….

चौकट : शेतकऱ्यांची मागणी- सन 2017 व 2019 मधील वंचित प्रकरणांची फेरपडताळणी करावी.- चालू कर्जमाफी यादीतील त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात.- पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा.- कर्ज नसल्यास अधिकृत दाखला द्यावा, अन्यथा थकबाकी असल्यास कर्जमाफी लागू करावी.- दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.फोटो..प्रकाश गायकवाड शिल्लकShow quoted text

Views: 82
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
महसूल दिनानिमित्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गौरव; महसूल वकील मित्र परिवाराचा अभिनव उपक्रम

महसूल दिनानिमित्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गौरव; महसूल वकील मित्र परिवाराचा अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)