• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पटतंय का बघा….गोपीनाथ मुंडेंबाबतचे दावे… पृथ्वीराज चव्हाणांचा शुद्ध फालतूपणा.. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
August 16, 2026
in Uncategorized
0
आठवणींच्या हिंदोळ्यावर…राष्ट्रपतींसमोर मी मारलेली उडी. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*पटतंय का बघा….**गोपीनाथ मुंडेंबाबतचे दावे… पृथ्वीराज चव्हाणांचा शुद्ध फालतूपणा..* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेसमध्ये येणार होते. त्याला सोनिया गांधींनी सहमती दर्शवली होती.

मात्र तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा विरोध होता असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे असेही सांगितले आहे की मुंडे आणि काँग्रेसचे तत्कालीन नेते अहमद पटेल यांच्यात चर्चा देखील झाली होती. त्यावेळी गोपीनाथ मुंडेंचा मला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्या असा आग्रह होता. जर आपण मंत्री झालो नाही, तर नागपूरचे आमच्या पक्षातले दोन नेते मला निवडून येऊ देणार नाहीत असेही त्यांचे म्हणणे होते. मात्र मुंडेंना मंत्रिपद देणे शक्य नव्हते.

म्हणून त्यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात बरेच वाद रंगलेले आहेत. गोपीनाथ मुंडेंचा अपघाती मृत्यू होऊन आजचा बारा वर्षे लोटली आहेत. या वर्षानंतर हा कथित गौप्यस्फोट करण्यामागे पृथ्वीराज चव्हाण यांना नेमके काय साधायचे आहे याबाबतही वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे एक कडवे नेते होते. पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.

१९८४ या काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून तळागाळातील नागरिकांना भाजपसोबत जोडले आणि पक्ष बळकट केला. १९९२ मध्ये विरोधी पक्षनेते झाल्यावर त्यांनी तत्कालीन शरद पवार सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. नंतरही महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढून त्यांनी शरद पवार सरकारच्या पतनाची पहिली वीट रोवली होती असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. गोपीनाथ मुंडे हे मूळचे संघाचे स्वयंसेवक, मराठवाड्यातील ओबीसी कुटुंबातून शिक्षण घेऊन पुढे आलेले तरुण म्हणून ते भाजपमध्ये सक्रिय झाले होते.

भाजपचेच दुसरे एक समकालीन नेते प्रमोद महाजन यांच्या बहिणीशी म्हणजेच प्रज्ञा महाजनांशी ते विवाहबद्ध झाले. त्यांच्या राजकीय प्रवासात प्रमोद महाजनांची त्यांना भक्कम साथ मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पक्ष चांगलाच भक्कम केला होता. विशेषतः शेटजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या भाजपला त्यांनी बहुजन समाजाचा पक्ष अशी नवी ओळख दिली होती.२००६ मध्ये प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यावर मुंडे काहीसे एकाकी झाले होते.

त्याच दरम्यान महाराष्ट्राच्या भाजपात मुंडेंना पक्षात तसे ज्युनिअर असलेले नितीन गडकरी यांचे प्रस्थ वाढत होते. गडकरी आणि मुंडे यांचे फारसे पटत नव्हते. त्यामुळेच मुंडे अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली होती. या अस्वस्थतेचा पहिला स्फोट २००७ मध्ये विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान झाला. एक दिवस गोपीनाथजींनी पक्षातील सर्व महत्त्वपूर्ण पदांचा राजीनामा देऊन टाकला होता. त्यामुळे उभ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती मात्र नंतर दिल्लीतील केंद्रीय नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यावर तीन दिवसांनी त्यांनी आपले हे बंड मागे घेतले होते. २००९ पर्यंत गोपीनाथजी महाराष्ट्राच्या विधानसभेत सक्रिय होते.

तिथे त्यांनी विरोधी पक्षनेते, भाजपाचे गटनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अशा विविध पदांवर काम करत आपल्या तडफदार कार्यशैलीचा परिचय दिला होता. २००९ मध्ये त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते लोकसभेत गेले होते. २००९ मध्येच नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. का तर कोण जाणे, पण तेव्हाही त्यांचे आणि मुंडेंचे फारसे पटत नव्हते. त्यामुळेच २०११-१२ मध्ये पुन्हा एकदा त्यांचे वाजले आणि तेव्हा मुंडे आता काँग्रेसमध्ये जाणार अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांनी असेच सर्व पदांचे राजीनामे दिले होते आणि आता ते काँग्रेसमध्ये जाणार आणि काँग्रेसमध्ये गेल्यावर कोणते मंत्रिपद मिळवणार याबाबत राजकीय वर्तुळात अटकळी बांधणे सुरू झाले होते

. मात्र यावेळी देखील लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज प्रभृतींनी मध्यस्थी करून त्यांचे बंड शमवले होते. नंतर २०१४ मध्ये ते पुन्हा बीडमधून निवडून आले. यावेळी देशात भाजपची सत्ता आली होती आणि त्या मंत्रिमंडळात मुंडे कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले होते. मात्र एक महिन्याच्या आतच त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. २०११-१२ मध्ये मुंडे काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा खूप रंगल्या होत्या. मात्र आपण भाजप कधीच सोडणार नाही, आपल्यावर संघाचे संस्कार आहेत, हेच मुंडे वारंवार पटवून सांगत होते. त्याप्रमाणे त्यांनी अखेरपर्यंत भाजप सोडली नव्हती. त्यामुळे आता मुंडेही नाहीत आणि डॉ. मनमोहन सिंग देखील हयात नाहीत, अशावेळी हा मुद्दा उकरून काढण्याची काय गरज होती असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात कुठेतरी सुप्त असा संघर्ष होता ही बाब नाकारता येत नाही.

मात्र त्यासाठी मुंडे भाजप सोडतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती यावरही विश्वास ठेवता येत नाही. दुसरे असे की नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत असे मुंड्यांनी म्हटले असल्याची शक्यता फार कमी आहे. कारण असे की जरी गडकरी आणि मुंडे यांच्यात सुप्त संघर्ष होता, तरीही फडणवीस आणि मुंडे यांचे संबंध अतिशय चांगले होते. किंबहुना देवेंद्र फडणवीस १९९९ मध्ये विधानसभेत आमदार म्हणून आल्यावर सुरुवातीच्या दिवसात फडणवीसांना योग्य अशी संधी देत आणि योग्य असे मार्गदर्शन करत गोपीनाथ मुंडे यांनीच घडवले होते. माझ्यासारखे विधिमंडळ वृत्तसंकलन करणारे अनेक पत्रकार याला साक्षी आहेत.

त्यामुळे फडणवीस त्यांना विरोध करतील असे म्हणणे हा हास्यास्पदच दावा म्हणावा लागेल.दुसरे असे की गोपीनाथ मुंडे हे बीडमधूनच निवडणूक लढवणार हे निश्चित होते. बीड ही त्यांची होम पीच आहे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. मुंडे ज्या समाजाचे आहेत त्या समाजाचे तिथे खूप असे वर्चस्व आहे. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात असले तरी ते तिथून निवडून येणे अशक्य नव्हते. दुसरे असे की फडणवीस आणि गडकरी हे दोघेही नागपुरातले कार्यकर्ते आहेत. नागपूर सोडून बीडमध्ये जाऊन बसून मुंडेंचा पराभव करणे त्यांना कितपत शक्य झाले असते हा देखील प्रश्न इथे उपस्थित होतो.

आणखी एक मुद्दा असा की व्यक्तिगत भांडणासाठी नितीन गडकरी हे पक्षाचे नुकसान करणारे नेतृत्व नाही हे गडकरींना ओळखणारे सर्वच मान्य करतील. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेला हा मुद्दा सुद्धा निरर्थकच म्हणावा लागेल.तरीही आता पृथ्वीराज चव्हाण यांना मुंडेंच्या अपघाती मृत्यूनंतर बारा वर्षांनी हा मुद्दा अस्तित्वात नसतानाही उकरुन काढण्याची गरज काय असा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे पालवे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या या आरोपाचे स्पष्ट शब्दात खंडन केले आहे. आपले वडील भाजपशीच एकनिष्ठ होते आणि शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. पक्ष सोडण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही, असे पंकजा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे

. भाजपाच्या इतरही ज्येष्ठ नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची अक्षरशा खिल्ली उडवलेली आहे. तरीही पृथ्वीराज चव्हाण यांनी आता हा मुद्दा उकरून काढण्यामागे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी या राजकारणात सध्या काँग्रेसपासून दुरावलेल्या ओबीसी समाजाला जवळ आणण्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रयत्न असून त्यासाठीच ओबीसींचे बुद्धिभेद करणारा हा दावा त्यांनी केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या समाजाच्या नेत्यालाच त्याच्यावर पक्षात उच्चवर्णीय अन्याय करत होते म्हणून पक्ष सोडण्याची वेळ आली होती, अशा पक्षासोबत तुम्ही का जाता, असे सांगून सध्या दुरावलेली ओबीसींची मते आपल्याकडे ओढण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आतापर्यंत ओबीसींना त्यांच्या मागणीप्रमाणे शक्य होतील त्या सवलती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज सुद्धा आम्हालाही आरक्षण आणि इतर सवलती मिळाव्यात म्हणून रस्त्यावर उतरलेला आहे. सध्या हा मराठा समाज तसाही काँग्रेसपासून दुरावलेलाच आहे‌. कारण काँग्रेसमधल्या काही मराठ्यांनी सत्तेची फळे उपभोगली आणि स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले. मात्र समाजासाठी काहीच केले नाही असे समाजातल्या तळागाळातल्या मंडळींचे म्हणणे आहे. त्यामुळेच मराठा समाज काँग्रेसपासून आता दुरावतो आहे,

तर ओबीसी समाज काँग्रेस सोबत सध्या नाहीच, असे म्हटले तरी चालेल. सध्या ओबीसी समाज भाजपासोबत गेलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा गोपीनाथ मुंडेंचे राजकारणात असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांनी कारण नसताना गोपीनाथ मुंडेंचे नाव घेत त्यांच्याबाबत असे हास्यास्पद दावे केले असावे ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र असे करून त्यांना अपेक्षित फायदा मिळेल का आणि पक्षासोबत ओबीसी समाजाला आणून किमान महाराष्ट्रात तरी सत्ता मिळवता येईल का हा खरा कळीचा मुद्दा राहणार आहे. मात्र राजकीय वर्तुळात पृथ्वीराज चव्हाण यांचे हे विधान अगदी हसण्यावारी नेले जात आहे. आजच एका ज्येष्ठ पत्रकाराने पृथ्वीराजबाबांना आता वयाची ८० वर्षे ओलांडल्यामुळे म्हातारचळ लागला की काय अशी शंका व्यक्त केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस मधले ज्येष्ठ नेते आहेत. केंद्रातही त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असे महत्त्वपूर्ण पद देखील सांभाळलेले आहे. काही काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत त्यांनी अशी निरर्थक हास्यास्पद विधाने करणे हे त्यांच्या महाराष्ट्रातील प्रतिमेला कुठेतरी धक्का लावणारे आहे हे निश्चित. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी गोपीनाथ मुंडे सारख्या कट्टर भाजप नेत्याबाबत शंका घेणे हा शुद्ध फालतूपणाच ठरतो हे निश्चित. अर्थात हे माझं मत झालं…. तुम्हाला हे पटतंय का बघा…. पटत नसल्यास स्पष्ट आणि परखड मते जरूर मांडा

Views: 62
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना

लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)