• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पुण्यात डॉ. जनार्दन भोसले यांना अमेरिकेतील लूशियाना विद्यापीठाची मानद डी.लिट. पदवीमराठी साहित्य, पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील बहुआयामी कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

माणगंगा by माणगंगा
August 17, 2026
in Uncategorized
0
पुण्यात डॉ. जनार्दन भोसले यांना अमेरिकेतील लूशियाना विद्यापीठाची मानद डी.लिट. पदवीमराठी साहित्य, पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील बहुआयामी कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

पुण्यात डॉ. जनार्दन भोसले यांना अमेरिकेतील लूशियाना विद्यापीठाची मानद डी.लिट. पदवीमराठी साहित्य, पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील बहुआयामी कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

पुणे : मराठी साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कवी, साहित्यिक, अभ्यासक, पत्रकार व समाजसेवक डॉ. जनार्दन भोसले यांना अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ लूशियाना यांच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (D.Litt.) ही मानद पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या बहुआयामी कार्याची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्राने घेतलेली दखल म्हणून या सन्मानाकडे पाहिले जात आहे.

पुणे हे देशातील महत्त्वाचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. याच पुण्यभूमीत झालेल्या या गौरवामुळे डॉ. भोसले यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आयपीएस अधिकारी तसेच काश्मीरमधील शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले.भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ‘निधर्मीवाद’ या समीक्षात्मक ग्रंथाची महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात विशेष दखल घेण्यात आली.

या पुस्तकाला २५ राज्यस्तरीय पुरस्कार आणि दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या संशोधनपर लेखनाबरोबरच काव्यनिर्मितीलाही विविध स्तरांवर गौरविण्यात आले असून, त्यांच्या साहित्यिक कार्याला व्यापक मान्यता मिळाली आहे.साहित्याबरोबरच डॉ. भोसले यांचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे. ‘दारू सोडवा अभियान’ राबवून व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचे काम ते करीत आहेत.

तंबाखूजन्य पदार्थ व गुटख्याच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी तरुणांमध्ये जनजागृती करून त्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन ते करतात.साहित्य, भाषा, संशोधन, पत्रकारिता, सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील या बहुआयामी योगदानाचा विचार करून डॉ. जनार्दन भोसले यांना ‘मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर इन मराठी’ (D.Litt.) या सन्मानाने गौरविण्यात आले.

डॉ. जनार्दन भोसले यांना मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल साहित्यिक डॉ. पंडितराव टापरे, कवी फ. शहाजिंदे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, रिझर्व्ह बँकेचे संचालक आशुतोष रारावीकर, सीआयडी अधिकारी संतोष देसाई, काशीबाई नवले कॉलजचे डॉ. अरविंद भोरे, डॉ. सचिन वानखेडे, डॉ. संदीप जाधव यांच्यासह वाई तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकार, बावधन ग्रामस्थ, मित्रपरिवार, वाचक, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.मराठी भाषा, साहित्य आणि सामाजिक बांधिलकीची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणाऱ्या डॉ. जनार्दन भोसले यांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाचा गौरव तर आहेच; मात्र त्याचबरोबर मराठी साहित्यविश्वासाठीही अभिमानाचा क्षण असल्याची भावना साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Views: 23
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
*ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

*ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)