• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
August 18, 2026
in Uncategorized
0
घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*घ्या समजून राजेहो..**बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन…* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.भारतात जंगलातील नक्षलवाद संपला असला तरी अजूनही ‘दिमागी’ नक्षलवाद कायम आहे अशा आशयाचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाला राष्ट्राला उद्देशून लाल किल्ल्यावरून भाषण करताना केले आहे

. लगेच दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेस बौद्धिक नक्षलवाद जपत असल्याचा आरोप केला आहे. याच्या उत्तरात विरोधी पक्षातील पी चिदंबरम अरविंद केजरीवाल अशा मान्यवरांनी “होय आम्ही नक्षलवादी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे” असे दावे करून नव्याच राजकीय वादाला तोंड फोडले आहे.भारतीय राजकारणात असे नवे नवे शब्दप्रयोग काही पहिल्यांदाच होत नाहीत.

यापूर्वी देखील तुकडे तुकडे गॅंग, भगवा दहशतवाद, अशा प्रकारचे शब्दप्रयोग झाले होते, आणि ते काही काळ रुजले देखील होते. मात्र नंतर सर्वांना त्याचा विसरही पडला होता. मधल्या काळात शहरी नक्षलवाद हा शब्दप्रयोग देखील वापरला गेला आणि तो रुढ देखील झाला आहे. त्याच्याच पुढे आता हा बौद्धिक नक्षलवाद आला आहे असे म्हणता येईल. बौद्धिक नक्षलवाद या विषयावर भाष्य करण्यापूर्वी नक्षलवाद म्हणजे काय हे देखील समजून घ्यायला हवे.

साधारणपणे १९६७-६८ च्या दरम्यान पश्चिम बंगाल मध्ये काही माओवादी नेते सक्रिय झाले आणि नक्षलबारी या गावातील मजुरांना एकत्र करत तिथल्या जमीनदारांविरुद्ध सशस्त्र संघर्षाची हाक दिली. शस्त्र संघर्ष करून या माओवाद्यांनी तिथल्या जमीनदारांची आणि प्रस्थापितांची दादागिरी मोडून काढली. हळूहळू हे लोण इतर गावांमध्ये पसरले. या संघर्षाची सुरुवात नक्षलबारी या गावातून सुरू झाली असल्यामुळे या चळवळीला नक्षलवादी चळवळ असे नाव पडले आणि प्रस्थापिताविरुद्ध सशस्त्र संघर्ष करून आपले म्हणणे मान्य करून घेणे याला नक्षलवाद असे म्हटले जाऊ लागले. ही नक्षलवादी चळवळ पश्चिम बंगालमधून निघत मग ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मग पुढे आंध्र प्रदेश कर्नाटक अशी सर्वदूर पोहोचली. ज्या टापूत ही चळवळ रुजली त्या टापूला रेड कॉरिडॉर असे म्हटले जाऊ लागले. या नक्षलवाद्यांनी ग्रामीण तरुणांना त्यांची डोकी भडकावून आपल्या चळवळीत सहभागी करून घ्यायचे त्यांना शस्त्र हाताळण्याचे शिक्षण द्यायचे आणि प्रस्थापितांच्या हत्या करत पुढे निघायचे असाच कार्यक्रम हाती घेतला होता.

परिणामी या सर्व परिसरात विकास कामे पूर्णतः थंडावली होती, आणि हजारो निरपराधांना आपले जीव गमवावे लागले होते. विदर्भातील गोंदिया गडचिरोली या परिसरात देखील नक्षलवादी कारवाया मोठ्या प्रमाणात होत्या. तिथे कोणी सरकारी अधिकारी बदलीवर जायला तयार नसायचा आणि त्या परिसरात कोणीही कंत्राटदार नवीन कामे करायला तयार नसायचा. ही चळवळ देशाचे संविधान मानत नव्हती, तर त्यांचे स्वतंत्र कायदे होते. अनेक तरुणांना विशेषतः आदिवासी समाजातील तरुण-तरुणींना भडकवून त्यांनी या चळवळीत सहभागी करून घेतले होते. १९६८ पासून तर २०१४ पर्यंत इथली सर्वच सरकारे अक्षरशः हतबल झाली होती. अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जीव गमवावे लागले होते आणि करोडोंचे सरकारी आणि खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले होते.मात्र नरेंद्र मोदी सरकार आल्यावर त्यांनी हा सशस्त्र नक्षलवाद संपवण्यासाठी पावले उचलली आणि आता हा सशस्त्र नक्षलवाद जवळजवळ आटोक्यात आला आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.

याच काळात या माओवाद्यांनी शहरात देखील आपले पाय पसरायला सुरुवात केली होती. अजूनही अनेक शहरांमध्ये हे माओवादी सक्रिय आहेत. साधारणपणे हे माओवादी उच्चशिक्षित विचारवंत अशी समाजमान्यता असलेले लोक असतात आणि आपल्या समाजमान्यतेचा उपयोग करून घेत ते अनेक तरुणांना भडकवत असतात. तरुणांची डोकी भडकवून प्रस्थापित व्यवस्था विशेषतः देशाचे संविधान आणि देशाचे प्रशासन याच्या विरोधात बंड करण्यासाठी तरुणांची डोकी भडकवण्याचे काम ते करत असतात.

मधल्या काळात वरवरा राव, कोबाड गांधी अशी अनेक नावे समोर आली होती. त्यातील काहींना पोलिसांनी पकडले तर काही अजूनही सक्रिय आहेत. देशात नरेंद्र मोदींच्या रूपाने उजव्या विचारसरणीचे सरकार सक्रिय झाले आहे. यापूर्वी सत्तेत असलेले काँग्रेस सरकार हे कुठेतरी डाव्यांशी जवळीक साघून होते. मात्र नरेंद्र मोदींचे सरकार आल्यावर ही सर्वच डावीमंडळी आणि विरोधक अस्वस्थ झाली आहेत. त्यांच्या अंदाजानुसार हे सरकार फार काळ टिकायला नको होते. मात्र त्यांच्या दुर्दैवाने लागोपाठ तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाल्यामुळे हे सर्वच लोक अस्वस्थ झाले आहेत. विशेष म्हणजे मोदींची धडाकेबाज कार्यशैली ही फक्त देशातच नाही तर प्रदेशातील ही अनेकांना कुठेतरी खटकते आहे. त्यामुळे परदेशी शक्तींना देखील हे हिंदुत्ववादी सरकार इथे नकोसे वाटते आहे. परिणामी देशात सातत्याने होत असलेली आंदोलने ही परदेशी शक्तींकडून स्पॉन्सर केली जात असल्याचाही आरोप केला जातो आहे. इथेच ही डावी मंडळी सक्रिय झालेली दिसत आहेत असा दावा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह त्यांचे सहकारी करत आहेत.हे तरुणाईची डोकी भडकवतात आणि देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप केला जातो आहे. त्यामुळेच दिमागी नक्षलवाद किंवा बौद्धिक नक्षलवाद हे नवे शब्द प्रयोग वापरात आलेले आहेत.

तसा विचार केल्यास आज तसही अनेक कथित गैर राजकीय गट विविध निरर्थक मुद्दे उपस्थित करून डोकी भडकवण्याचा प्रयत्न करतात आणि मगी विरोधी पक्ष त्यांना साथ देतात असे चित्र अनेकदा बघण्यात येते. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे तर नीट परीक्षा पेपर फूट प्रकरणाचे घेता येईल. या आंदोलनात अक्षरशः सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे मग विरोधकांनी सुद्धा चर्चेचे मार्ग सोडून चक्क पंतप्रधानांच्या घरासमोर हल्लाबोल करण्याचे देखील प्रयत्न झाले. हे देशात अराजक माजवण्याचेच प्रयत्न होते असे म्हणता येते. जसा प्रकार नीट परीक्षांबाबत झाला तसाच प्रकार आता पेट्रोल मथ्ये इथेनॉल मिसळण्यावरूनही केला जातो.

आहे वंदे मातरम ची पूर्ण सहा कडवी गाण्यावरून देखील नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्याचप्रमाणे राम मंदिरातील कथित चोरी प्रकरण देखील यांच्या हिटलिस्टवर आहे. हे बघता शहरातील आणि गावांमधील तरुणांची डोकी भडकवायची आणि देशात अराजक निर्माण करायचे असाच प्रयत्न दिसतो. वाचकांना आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये असाच प्रकार घडला. बांगलादेशमध्ये देखील वर्षभरापूर्वी असेच तरुणाईला भडकवले गेले होते. तसेच प्रकार भारतात करण्याचाही प्रयत्न होत आहे. या मंडळींना देशहित महत्त्वाचे नाही तर फक्त सत्ताबदल महत्त्वाचा आहे. त्यात त्यांचे काही विविध स्वार्थ गुंतलेले आहेत. त्यामुळेच हे प्रकार होत आहेत. देशाशी त्यांना काहीही देणे घेणे नाही असे चित्र दिसते आहे, आणि विरोधकांकडूनही तोच आरोप केला जातो आहे. नरेंद्र मोदी देशाचे संविधान गुंडाळून ठेवतात असा आरोप करत हीच मंडळी संविधानालाही कुठेतरी विरोध करताना दिसत आहेत.

शेवटी नक्षलवाद म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करणे प्रस्थापित व्यवस्था उखडून फेकण्यातच त्यांना रस आहे. आता शस्त्राच्या मदतीने हा नक्षलवाद साध्य करता येत नसल्यामुळेच ते आपले बुद्धीचातुर्य वापरून तरुणाईची डोके भडकवत देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच याला दिमागी नक्षलवाद किंवा मग बौद्धिक नक्षलवाद असे नाव दिले जात आहे. यासाठी धर्माचा देखील उपयोग केला जातो आहे. आपल्या देशात निधर्मिकतावाद या गोंडस नावाखाली फक्त हिंदू धर्माला विरोध करणे आणि इतर धर्मांना डोक्यावर घेणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात होतो आहे. हिंदू संघटित नसल्यामुळे यांचे फावते आहे. हिंदू धर्म हा सुरुवातीपासून सर्व समावेशक आणि सहिष्णू वृत्तीचा असा राहिला आहे. त्या तुलनेत इतर धर्म इथे येऊन इथल्या व्यक्तींना पाठवणे त्यांची मंदिरे फोडून तिथे आपल्या मशिदी किंवा चर्च उभे करणे आणि त्यांनी धर्मांतरीत केलेल्या व्यक्तींना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचा प्रयत्न केल्यास ओरड करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात करत असतात आणि या मुद्द्यावरूनही अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करतात. भारत देश हा प्राचीन काळापासून हिंदूंचाच देश आहे. त्यामुळे आजही इथे हिंदू मोठ्या संख्येत आहेत. तरीही इथे हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न होतो आणि त्या माध्यमातून अराजक निर्माण करण्याचाही प्रयत्न होतो आहे.

याला देखील बौद्धिक नक्षलवादाच म्हणता येणार नाही का?अशाप्रकारे देशहिताला पर्यायाने राष्ट्रालाच विरोध करणारेही जरी विचारवंत असले तरी ते प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकायला निघाले असल्यामुळे त्यांना बौद्धिक नक्षलवादीच म्हणायला हवे असे माझे मत आहे. ते या देशातील विशेषतः तरुणाईला भडकावून देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातून सत्ताबदल करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे हे स्पष्ट दिसते आहे..

इथेच देशातील राष्ट्रप्रेमी सुजाण सुबुद्ध नागरिकांचा कस लागणार आहे. या देशातील तरुणाई आणि बुद्धिजीवी माणूस अशा औद्योगिक नक्षलवाद्यांच्या कह्यात जाऊ नये यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. जर आपण सर्वांनी जर संघटितपणे प्रयत्न केले तर हा बौद्धिक नक्षलवाद संपायला वेळ लागणार नाही हे निश्चित. अर्थात मी माझे मत व्यक्त केले आहे… वाचकांकडून या विषयावर स्पष्ट आणि परखड मते अपेक्षित आहेत. वाचकहो पटतंय का तुम्हाला हे……? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो…

Views: 39
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आठवणींच्या हिंदोळ्यावर…आणीबाणीनंतरचे बाळासाहेब देवरसांचे झालेले अभूतपूर्व स्वागत ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)