• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर आठवण यशवंत देवांची… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

माणगंगा by माणगंगा
September 3, 2026
in Uncategorized
0
घ्या समजून राजेहो….**डॉ. मोहन भागवतांच्या विधानाचा अन्वयार्थ*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*आठवणींच्या हिंदोळ्यावर* *आठवण यशवंत देवांची…* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.परवाच्या रविवारी झी मराठीवर “सा रे ग म प” या कार्यक्रमात “वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा… मी डोलकर.. डोलकर.. डोलकर दर्याचा राजा.. या गीताच्या ओळी ऐकल्या. साधारणपणे ५४-५५ वर्षांपूर्वी मी कॉलेजमध्ये शिकत असताना हे कोळीगीत प्रचंड प्रसिद्ध झाले होते, आणि सगळ्यांच्या तोंडो-तोंडी या गीताच्या ओळी होत्या.

त्या काळात ख्यातनाम कवी आणि संगीतकार यशवंत देव हे अशा प्रचलित गाण्यांवर विडंबन गीते तयार करायचे आणि गाऊन दाखवायचे. त्यावेळी होळीच्या दिवशी आकाशवाणीवर या विडंबन गीतांचा कार्यक्रम सादर होत असे. माझ्या आठवणीनुसार १९७१ किंवा १९७२ च्या होळीच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात यशवंत देवांनी या गाण्याचे विडंबन गीत सादर केले होते. ते रस्त्यावर उभा राहून पोरींवर लाईन मारणारा मजनू आणि त्याला उत्तर देणारी तडफदार मुलगी यांच्यावर रचलेले गीत होते. त्याच्या ओळी होत्या पोरांनो ऐका रे ऐका रे ऐका…. जरा बोल तरी ग बघ तरी ग प्रेमाने झालोय मी बेजार… त्या दिवशी वल्हव रे नाखवा हे गीत ऐकल्यावर मला लगेचच हे विडंबन गीत आठवले. आणि त्यामुळेच यशवंत देवांच्या आठवणी देखील जाग्या झाल्या.

आकाशवाणीत संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरी करणारे यशवंत देव यांची बदली काही काळ नागपूर आकाशवाणीवर झाली होती. त्यावेळी नागपुरात ठीक ठिकाणी विशेषतः गणेशोत्सव आणि शारदोत्सवात त्यांचे काव्यवाचनाचे आणि संगीताचे जाहीर कार्यक्रम होत असत. अशाच एका कार्यक्रमात मी कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना भेटल्याचे मला आठवते. कालांतराने त्यांची बदली नागपूरहून पुन्हा मुंबईला झाली आणि मग भेटीचा योग नव्हता. हा भेटीचा योग आला तब्बल एक तपानंतर, म्हणजेच १९८८ साली. एव्हाना मी शिक्षणातून व्यवसायात लागलो होतो. काही वर्ष दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार आणि पत्रकार म्हणून काम केल्यावर मी दूरदर्शनसाठी कार्यक्रम निर्मिती करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी बँकेचे मला कर्ज देखील मंजूर झाले होते. यशवंत देवांनी शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केलेली गीते यावर एक दूरदर्शन मालिका करावी असे आमच्या डोक्यात होते. त्यासाठी मी त्यांना एक पत्रही टाकले होते. माझे एक सहकारी मित्र जालंदर पुरोहित हे त्यावेळी एम ई सी एल मध्ये जनसंपर्क प्रबंधक म्हणून कार्यरत होते. त्यांचीच ही संकल्पना होती.. त्यावेळी यशवंत देव हे नागपूरचे माझेच एक स्नेही डॉ. भैय्यासाहेब घटाटे यांच्या मुलाच्या लग्नासाठी नागपूरला आले होते. या लग्नात त्यांचा काव्यगायनाचा कार्यक्रम देखील झाला होता. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो.

कार्यक्रमानंतर मी माझी ओळख करून देत त्यांच्याशी बोललो आणि त्यावेळी माझे पत्र मिळाल्याचे देखील त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी आमदार निवास मध्ये त्यांना भेटायचे ठरले. ठरल्याप्रमाणे मी आणि जालंदर पुरोहित सकाळी नऊ वाजता त्यांना आमदार निवासात भेटण्यासाठी गेलो. त्यांच्या रूमवर गेलो तेव्हा ते तयारीतच होते. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी करुणा देव यादेखील आलेल्या होत्या. तिथे गेल्यावर लगेचच ते म्हणाले ,”चला आमची नाश्त्याची वेळ झाली आहे, तुम्ही देखील आमच्याबरोबर चला.” मग आम्ही सर्वच आमदार निवास च्या कॅन्टीनमध्ये नाश्त्यासाठी गेलो. नाश्त्याच्या टेबलवरच आमच्या गप्पा सुरू झाल्या.

मी आणि जालंदर पुरोहित यांनी त्यांना आमच्या डोक्यातील आयडिया सांगितली. त्यावर त्यांनी देखील काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. हा कार्यक्रम आपण जरूर करू या, तो नक्की गाजेल असेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. मग आमच्या इतर गप्पा देखील सुरू झाल्या. त्यांनी मी आणि जालंदर पूर्वी आम्हा दोघांचीही चौकशी केली. करुणा देवांना जालंदर हे नाव काहीसे वेगळे वाटत होते. त्याबद्दल त्यांनी विचारले तेव्हा पुरोहितांनी त्याचा खुलासाही केला. त्यावर यशवंत देव गमतीत म्हणाले “मला हे जालंधर नाव म्हणजे बिलंदरचा भाऊ असल्यासारखे वाटते.” त्यावर सर्वच जोरदार हसले होते. मग करूनाताईंनी माझी देखील चौकशी केली.

त्यावेळी माझे लग्न व्हायचे होते. तेव्हा “तुम्हाला कशी मुलगी हवी सांगा मी मुंबईत तुमच्यासाठी शोधते” असा आग्रह धरत त्या दोघांनी माझ्या फिरक्या घेतल्या होत्या. या भेटीनंतर काही काळ आमचा पत्रव्यवहार देखील झाला. मी दूरदर्शनला या कार्यक्रमाबाबत प्रस्ताव दिला होता. मात्र काही कारणाने तो मंजूर झाला नाही. दरम्यानच्या काळात बँक आणि राज्य सरकार यांच्यातील परस्परांमधल्या असहकारामुळे माझा तो कार्यक्रम निर्मिती प्रकल्प पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. काही काळ अडचणीत काढून मग मी पूर्णवेळ पत्रकारितेत आलो.१९९५ पासून माझ्या एका आमदार मित्राचे प्रसिद्धीचे आणि विधानसभेचे कामकाज सांभाळून देण्यासाठी मी मुंबईला जात असे. १९९७ मध्ये याच आमदार मित्रांबरोबर अधिवेशन काळात मुंबईच्या विधानभवनात एका मंत्र्याच्या दालनात काही कामाने मी गेलो होतो. तिथे भेटणा-यांची बरीच गर्दी होती. अचानक मी उभे उभा असताना मागून कोणीतरी आपल्याला टोकते आहे असे जाणवले. मी मागे वळून बघितले तर ते यशवंत देव होते. मला बघताच ते लगेच म्हणाले, “अहो मी मघापासून आठवतोय, आपण आधी कधीतरी भेटलेलो आहोत, पण कुठे भेटलो ते आठवत नाही आणि आपण कोण तेही आठवत नाही.” मग मी लगेच त्यांना ओळख दिली आणि आधी आपण असे असे भेटलो होतो,

हे ऐकून त्यांना खूपच आनंद झालेला दिसला. मग माझ्या आमदार मित्रांची देखील मी त्यांची ओळख करून दिली. त्यांच्यासमवेत त्यांचेही एक स्नेही होते त्यांचीही त्यांनी आम्हाला ओळख करून दिली. तिथले काम आटोपल्यावर मग आम्ही विधान भवनच्याच कॅन्टीनमध्ये एकत्र चहा घेतला आणि जुन्या आठवणी जाग्या केल्या. त्यावेळी यशवंत देव दादरला शिवाजी पार्कजवळ राहायचे. बहुदा त्यावेळी ते एकटेच राहत असावे. त्या काळात मी देखील दादरला रानडे रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये ब्ल्यू जेम मध्ये उतरत असे. सकाळी तयार होऊन पुढल्या कामाला निघण्यापूर्वी रानडे रोड गोखले रोड क्रॉसिंगला असलेल्या हॉटेल विसावा मध्ये मी सकाळच्या नाश्त्यासाठी जात असे. विधानभवनातल्या या भेटीनंतर दुसऱ्याच आठवड्यात सकाळी नाष्ट्यानंतर उठून निघत असताना अचानक “अहो पाठक” असा आवाज आला.

मी पळून बघितले. तर ते यशवंत देवच होते मग मी देखील थांबलो आणि थोडा वेळ आमच्या गप्पा झाल्या. मी सुद्धा दररोज इथे सकाळी नाश्त्याला येत असतो असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. मग बरेचदा तिथेच आमची भेट व्हायची. ते अनेकदा सांगायचे,” इथे जवळच माझे घर आहे, तुम्ही घरी कधीतरी या,” पण माझ्या कामाच्या व्यापात मला त्यांच्या घरी जाणे कधी शक्य झाले नाही. काही वेळा संध्याकाळी सहाच्या सुमारास देखील ते तिथे चहाला आलेले दिसायचे. मी दिसलो की आवाज देऊन ते थोडा वेळ तरी गप्पा मारायचे. असा हा आमचा भेटीचा सिलसिला बरेच दिवस चालला वयापरत्वे ते थकले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचा एक केअर टेकर मुलगा देखील असायचा. वयाने थकले तरी त्यांची बुद्धी तल्लख होती. गप्पांच्या ओघात ते कधी कधी जुने किस्से ऐकवायचे. नंतर हळूहळू त्यांच्या भेटी कमी झाल्या. त्यावेळी तिथेच जवळ असलेले माझे मित्र डॉ. अनिल वाकणकर यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा आजकाल देवांची तब्येत ठीक नसते असे त्यांच्याकडून कळले होते. नंतर माझे मुंबईला जाणे कमी झाले,

आणि मुंबईला गेलो तरी ब्ल्युजेम मध्ये उतरणे बंद झाले होते. त्यामुळे देवांच्या भेटी होत नव्हत्या. मात्र आठवणी अधून मधून यायच्या. आणि काही वर्षांपूर्वी अचानक एक दिवस वृत्तपत्रात यशवंत देव वारल्याची बातमी आली .त्या दिवशी दोन-तीन वृत्तपत्रांनी मला त्यांच्यावर लेखही मागितला होता. मी तो पाठवला देखील होतो .माझ्या आठवणीनुसार माझ्या हितगुज या पुस्तकात तो लेख समाविष्ट झालेला आहे. यशवंत देव जाऊन देखील काही वर्षे लोटलेली आहेत. त्यामुळे ते नाव काहीसे विस्मरणात गेले होते. अर्थात तरीही त्यांच्या अनेक गीतांच्या ओळी आजही तोंडावर येतातच. त्यादिवशी वल्लव रे नाखवा हो या गाण्याच्या ओळी ऐकल्या आणि यशवंत देवांच्या त्या विडंबन गीतांची देखील आठवण झाली.

Views: 48
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
स्पष्ट आणि परखड…सर्वच आयोजनांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालायलाच हवीज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

स्पष्ट आणि परखड…सर्वच आयोजनांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालायलाच हवीज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)