वरकुटे – मलवडी येथे छप्पराला आग लागून ६ शेळ्या दगावल्या
वरकुटे – मलवडी / वार्ताहर
माण तालुक्यातील वरकुटे - मलवडी येथील आबा अशोक चव्हाण यांच्या छप्पराला आग लागून सहा गाभण शेळ्या दगावल्या असून संसारोपयोगी साहित्य ही जळून खाक झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी आबा चव्हाण हे वरकुटे - मलवडी हद्दीतील डूंबा नावाच्या शिवारात आपल्या कुंटुंबासोबत राहत आहे. चव्हाण हे मजुरी बरोबर मोजक्याच ६ शेळीचे पालन पोषण करत होता. बुधवार सकाळी १०.३० वा. अचानक राहत असलेल्या छप्पराला आग लागली. यात सहा गाभण शेळ्या जाग्यावरच जळून खाक झाल्या आहेत. त्याच घरातील सर्व साहित्य , धान्य , कपडे जळून राख झाली आहे. या आगीत चव्हाण यांचे सुमारे ८० ते ९० हजाराचे नुकसान झाले आहे. आबा चव्हाण व त्यांचे कुंटुंंब या आगीपासून थोडक्यात बचावले आहे. त्यांना वरकुटे - मलवडी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.
चव्हाण यांची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची आहे. त्या सहा शेळ्यावरच आपले कुंटुंब चालवत होता. या आगीत त्याचे होत्याचे नव्हते करून टाकले आहे. संपूर्ण संसा उध्वस्त झाला आहे. या आगीचा गावकामगार तलाठी गणेश म्हेत्रे यांनी जागेवर जाऊन पंचनामा केला आहे. या नुकसानीची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली आहे. आबा चव्हाण यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी .
चौकट
मदतीचे आवाहन
आबा अशोक चव्हाण रा. डुंबा – पडळकर खडक – तलाव यांच्या राहत्या छप्पर वजा कोपीला बूधवारी सकाळी आग लागली आणि त्यात त्यांच कुटुंब थोडक्यात बचावले आहे. मात्र आगीमध्ये त्यांच्या ६ गाबण शेळ्या जागीच मृत्यू पावल्या आहेत. अतिशय दुःखद घटना झाली आहे. आबा चव्हाण हे अतिशय प्रामाणिक पण गरीब कुटुबांतील तरूण संघर्षमय जीवन जगणारा व्यक्ती आहे. त्यांच्यावर आलेल्या संकटातून सावरण्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्याला मदतीचा हात देऊन , नव्याने जगण्याची एक उमेद देऊ या . यासाठी वरकुटे – मलवडी परिसरातील दानशूर व्यक्तीने मदत करावी .
- धिरज जगताप
सामाजिक कार्यकर्ते , वरकुटे – मलवडी







