मदनी चॅरिटेबल ट्रस्ट जत तालुक्याचे अध्यक्ष फैयाज शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माणगंगा न्यूज पोर्टल जत:-
आज २० सप्टेंबर रोजी धावडवाडी गावचे युवा समाजसेवक कु.फैयाज शेख यांचा वाढदिवस आहे.फैयाज शेख यांनी कोरोना काळात मदनी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून व धावडवाडीतील सवंगड्यांच्या सहकार्याने कोरोना बाधीत मृतदेहांचे अंतिम संस्कार केले आहे.कोरोना काळात ज्या मृतांचे नातेवाईक मृतदेहाच्या जवळ येण्यास भिती बाळगत असताना त्यांनी आपल्या जिवाची कसलीही पर्वा न करता केवळ माणूसकी म्हणून कसलाही मोबदला न घेता हिंदू मुस्लिम असा भेदभाव न करता तालुक्यातीलच नव्हे तर तालुक्याबाहेरील ही कोरोना बाधीत मृतांचे अंत्यसंस्कार
ज्या त्या रितीरिवाजाप्रमाणे केले.याची पोहोच पावती म्हणून काही दिवसांपूर्वी कुंभारी गावचे युवा नेते धनाजी शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ ठेवला त्या प्रसंगी फैयाज शेख व त्यांच्या टीमचे कौतुक करण्यात आले.
गेल्या वर्षी २०२० साली अचानकपणे लॉकडाऊन करण्यात आले. लोकांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले. कांमधंदे बंद पडले. तरूण युवक बेरोजगार होऊन रस्त्यावर आले. अशा कठीण काळात फैयाज शेख यांनी डि. आर. एन. या कंपनीचे रस्ता संरक्षण खड्डे काढणे, पुलावरील संरक्षक भिंती बांधणे, कलर करणे अशी अनेक कामे घेऊन अशा अनेक बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून देण्याचे काम फैयाज शेख यांनी केले आहे. गावातील अनेक चांगल्या सामाजिक कामांमध्ये हिरीरीने भाग घेऊन ते काम प्रामाणिकपणे पार पाडतात. फैयाज शेख यांनी यापुढील काळातही असेच समाजकार्य करून आपल्या गावाचे नाव लौकिक करावे हि अपेक्षा.फैयाज तुझे भावी आयुष्य सुखाचे,समाधानाचे, आरोग्याचे जावो हिच अल्लाह चरणी प्रार्थना! शुभेच्छुक:अहमदअली शेख, ज्येष्ठ बी. ई. एस. टी. बस चालक मुंबई







