वरकुटे – मलवडीचा युवक शिरवळ अपघातात ठार
वरकुटे – मलवडी / वार्ताहर
शिरवळ ता. खंडाळा येथे दुचाकीला दुध टँकरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात वरकुटे – मलवडी ता.माण येथील दुचाकी चालक ठार झाला तर एक महिला जखमी झाली आहे.
संजय दिनकर बनसोडे ( वय ३८ ) रा. वरकुटे – मलवडी ता. माण असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याच्या पत्नी स्मिता संजय बनसोडे ( वय ३० ) असे जखमी महिलेचे नाव आहे. वरकुटे – मलवडी येथील रहिवासी असलेले संजय बनसोडे चाकण पुणे एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. चाकण येथून पत्नी समवेत दुचाकी ( क्र.एम एच १० – बीडी -६९५० )
वरून गावी निघाले होते. ते शिरवळ एसटी स्टँड जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुध टँकर ( क्र. एम एच – ११ – एएल – ८२९९ ) ने दुचाकीला जोरदार धडक दिली.
यामध्ये संजय बनसोडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. या घटनेची फिर्याद स्मिता बनसोडे यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या पश्चात आई , पत्नी , दोन भाऊ , भावजय , पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार दि. २५ रोजी सकाळी ८ वा.वरकुटे – मलवडी ( शेनवडी फाटा ) येथे होणार आहे.







