• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, December 16, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home आरोग्य

आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर….

माणगंगा by माणगंगा
September 25, 2021
in आरोग्य
0
आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर….

आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर

मुंबई, दि. २४ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज दिली. अर्ज भरलेल्या प्रत्येक उमेदवाराला परिक्षेसाठी बसण्याची संधी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार मिळाली पाहिजे म्हणून सर्व उमेदवारांच्या हिताचा विचार करुन लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ही परीक्षा उद्या शनिवारी आणि रविवारी आयोजित केली होती.

डॉ. पाटील यांनी सांगितले की ही परीक्षा घेण्यासाठी न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार करण्यात आला होता. या कंपनीची निवड राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागा (माहिती तंत्रज्ञान) यांच्या एकवीस जानेवारी २०२१ रोजी ओएमआर व्हेंडौर पॅनेलची नियुक्ती करण्यात आली आहे. या पॅनेलमधील सर्व कंपन्यांच्या सक्षमता तपासणी साठी सर्वंकष चाचणी विभागाच्या वतीने घेण्यात आली होती. शासन नियुक्त पॅनेलमधील चाचणीत प्रथम आलेल्या न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस भरतीचे काम करण्यासाठी करारबद्ध केले होते.

करारातील अटीनुसार आरोग्य विभागाने प्रश्न पत्रिका संच गोपनीय रित्या कंपनीस हस्तांतरण करणे एवढीच जबाबदारी विभागाची होती. भरती प्रक्रियेसाठी संकेतस्थळ विकसित करणे, ऑनलाईन अर्ज मागवणे, उमेदवारांना प्रवेशपत्र देणे, शाळा महाविद्यालये अधिग्रहित करुन बैठक व्यवस्था करणे, लेखी परीक्षा घेणे, गुणवत्ता यादी तयार करणे ही सर्व कामे कंपनीची होती.

मात्र आरोग्य विभागाने सर्व सहकार्य करुन देखील न्यासा कम्युनिकेशन कंपनी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आणि बैठक व्यवस्था करण्यात अपयशी ठरली आहे. परीक्षेची पूर्व तयारी पूर्ण न झाल्याने कंपनीच्या संचालकांनी आज सायंकाळी सात वाजता परीक्षा घेण्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाली याची खात्री करुनच परीक्षेचे आयोजन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ही परीक्षा सर्व तांत्रिक बाबींची पूर्व तयारी करुन लवकरच घेण्यात येईल. परीक्षेची नियोजित तारीख सर्व उमेदवारांना विभागाचे संकेतस्थळ, ई-मेल, एसएमएस व्दारे कळविण्यात येईल, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Views: 1,074
Share

Related Posts

भोरखेडा पटेल विद्यालयात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
आरोग्य

भोरखेडा पटेल विद्यालयात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

July 24, 2024
‘डी. वाय. पाटील’च्या डीनपदी बोगस डॉक्टर
आरोग्य

‘डी. वाय. पाटील’च्या डीनपदी बोगस डॉक्टर

January 7, 2023
१ नोव्हेंबर  जागतिक शाकाहार दिन……
आरोग्य

१ नोव्हेंबर जागतिक शाकाहार दिन……

November 1, 2021
कंचनपूर येथे रक्तदान शिबिर…..
आरोग्य

कंचनपूर येथे रक्तदान शिबिर…..

October 12, 2021
१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी
आरोग्य

१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी

August 16, 2021
चक्क एका वर्षाच्या नायजेरिअन मुलीवर झाली यशस्वीपणे हृदय-शस्त्रक्रिया !!
आरोग्य

चक्क एका वर्षाच्या नायजेरिअन मुलीवर झाली यशस्वीपणे हृदय-शस्त्रक्रिया !!

July 29, 2021
Next Post
आटपाडी पंचायत समिती महिला सदस्याच्या शेताचे ३० लाखाचे नुकसान .

आटपाडी पंचायत समिती महिला सदस्याच्या शेताचे ३० लाखाचे नुकसान .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
  • .. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
  • खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
  • नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)