विजय शिंगाडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
बापूसाहेब मिसाळ
वरकुटे – मलवडी – प्रतिनिधी
माण तालुक्यातील मानेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय रामचंद्र शिंगाडे यांना नुकताच माण पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार माजी मंत्री आ. महादेवराव जानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दहिवडी ता.माण येथील स्वाती मंगल कार्यालयात माण पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी माजी सनदी अधिकारी श्री. प्रभाकर देशमुख , शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे , माण पंचायत समितीच्या सभापती सौ. लतिका विरकर , उपसभापती पै. नितीन राजगे , जि.प.सदस्य अरूण गोरे , जि.प. सदस्या सौ. सुवर्णा देसाई , गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील , शिक्षणविस्तार अधिकारी सौ.सोनाली विभूते , शिक्षणविस्तार अधिकारी सौ.संगिता जाधव , पंचायत समितीचे सर्व सदस्य , शिक्षक उपस्थित होते.
विजय शिंगाडे यांनी गुणवत्तेबरोबर शाळेत शैक्षणिक उठावातून भरीव कार्य केले आहे. निर्मलग्राम , स्वच्छता अभियान , कुंटुब कल्याण , पर्यावरण , महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान , ग्रामसम्रुध्दी अभियान , यासारख्या शासकीय योजनेत मोलाचे सहकार्य केले आहे. त्याचबरोबर मानेवस्ती शाळेचा माण तालुक्यात लौकिक वाढवल्याने त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे.
विजय शिंगाडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मुंबई आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे , जिल्हा बँकेचे संचालक अनिलभाऊ देसाई , जि.प. सदस्या सुवर्णाताई देसाई , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभय जगताप , शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे , संचालक राजाराम खाडे , शिक्षक भारतीचे अध्यक्ष रमेश शिंदे , शिक्षक समितीचे सरचिटणीस विजय बनसोडे , शिक्षक संघाचे सुभाष गोंजारी ,माजी उपसभापती दादासाहेब शिंगाडे , सरपंच बाळकृष्ण जगताप , माण तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम शिंगाडे , माण – खटाव रासपचे अध्यक्ष प्रा.सचिन होनमाने , सरपंच सुरेश बनगर , माण तालुका काँग्रेसचे माजी तालूकाध्यक्ष संजय जगताप , माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राजेश शिंगाडे , पोलीस पाटील शहाजी बनगर , अँड. सतीश जगताप , माजी सरपंच संजय शिंगाडे , माजी सरपंच वैभव शिंगाडे , भागवत अनुसे , ज्ञानेश्वर बनगर , उपसरपंच सागर बनगर , बापूसाहेब मिसाळ आदींनी अभिनंदन केले आहे.







