नरवणे( प्रतिनिधी) .
गुरुवार दि. ३० सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी विद्यालय व ज्यु. कॉलेज, दिवड मध्ये के आबासाहेब पोळ शिक्षण शिक्षण प्रसारक सेवा मार्डी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गिय माजी आमदार सदाशिवराव पोळ तात्या यांचा सहावा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी दिवड गावचे उपसरपंच दादासो सावंत, नवनाथ शिंदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधजी सावंत, हणमंत सावंत, निळेश सावंत, गणेश सावंत, संजय सावंत, प्राचार्य एस.बी. गोरे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते तात्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात अलि.
सोमनाथ गाडे, ब्रम्हदेव माने सर या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ग्रामस्थ हणमंत सावंत यांनीही तात्यांच्या जीवन चरियावरती आपले मनोगत व्यक्त केले. नंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री एस.बी. गोरे सर यांनी अध्यक्षीय भाषणात तात्यांच्या जीवनाचा शैक्षणिक सामाजिक व राजकीय प्रवास कसा झाला हे व्यक्त केले. पोळ तात्यांच्या सहाव्या पुण्य स्मरणानिमित्त शाळेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रम्हदेव माने यांनी केले. श्री बापू खाडे सर यांनी आभार व्यक्त केले. अशा प्रकारे विद्याळ्यात स्वर्गिय सदाशिवराव पोळ तात्यांचा सहावा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अशी माहिती हायस्कूलचे शिक्षक मनोहर काटकर सर यांनी दिली.







