पाटण -अक्कलकोट एस.टी. सेवा लवकरच सुरू होतेय
सातारा सोलापूर व सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना खुशखबर दिनांक 7.10.2021 घटस्थापनेचा मुहूर्त साधून पाटण आगारामार्फत आपल्या भागातील स्वामींच्या भक्तांसाठी पाटण – अक्कलकोट ही बस सुरू करण्यात येत आहे.
तरी पाटण वरून ही बस सकाळी 10.30 ला सुटेल व अक्कलकोट येथे मुक्कामी जाऊन संध्याकाळी होणार्या स्वामींच्या आरतीचा, प्रसादाचा लाभ भक्तांना मिळणार आहे. मुक्काम करून सकाळी 6.45 परत याच बसने आपल्या गावी येता येणार आहे.
तसेच गलाई बांधवांसाठी या बसने त्यांच्या भागात सोलापूर,पंढरपूर येथून जाणार्या रेल्वे सापडू शकते.
तरी सर्व नागरिकांनी या बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त भक्तांनी घ्यावा.







