सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीद्वारे ऑनलाईन मीडिया प्रदर्शनाचे आयोजन
सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीद्वारे आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून मीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन 24 जानेवारी 2022 सकाळी 11 वाजता करण्यात येईल. 24 आणि 25 जानेवारी या दोन दिवसांत ‘पुस्तकांच्या पलीकडे शिक्षण- नव्या युगातील माध्यम साक्षरतेचा सराव’ नावाचे वर्च्युअल प्रदर्शन केले जाईल. म्हणूनच तरुणांना मास मीडियाबद्दल शिक्षित करणे हे आव्हानात्मक असले तरी महत्त्वाचे काम आहे. मुंबईतील सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या अनोख्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट नेमके हेच आहे.
माध्यम साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यशाळा आणि समाजावर माध्यम साक्षरतेचा होणारा प्रभाव, अधोरेखित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे उपक्रम प्रदर्शनाद्वारे आयोजित केले जातील. तरुणांना विविध मीडिया संदर्भात प्रश्न विचारण्यासाठी, त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी, प्रशंसा करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी मीडिया साक्षरता आवश्यक आहे हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
मीडिया अकादमीच्या तीन वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन, मीडिया क्षेत्रातील विविध करिअर विद्यार्थ्यांना ओळख करून देत, विविध स्तरांवर माध्यम संस्थांशी जोडून घेणे, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी निर्माण करणे हा या मीडिया प्रदर्शनाचा मूळ उद्देश आहे. मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचा कंटेंट आणि प्रदर्शन माध्यम क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती सह दोन विशेष कार्यशाळा असतील. ज्यामध्ये मीडिया साक्षरतेचा समाजावर होणारा परिणाम आणि अनेक विकसित तंत्रज्ञानांवर प्रकाश टाकला जाईल.
सलाम बॉम्बे फाऊंडेशन, प्रकल्प उपाध्यक्ष (कला आणि मीडिया) राजश्री कदम म्हणाल्या, “समाजातील विविध स्तर, वर्ग व प्रेक्षक यांना माहिती देण्याची आणि शिक्षित करण्याची सर्वव्यापी शक्ती प्रसारमाध्यमांमध्ये आहे. अत्यावश्यक आहे की आपण माहिती मिळवत माध्यम साक्षर रहावे. आमचा विश्वास आहे की आमचे विद्यार्थी बदल घडवणारे जबाबदार तरुण आहेत आणि ते त्यांच्या समुदायांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा करू शकतात. हे लक्षात घेऊन, मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांना दोन अत्यंत महत्त्वाच्या साधनांनी सज्ज करण्यावर लक्ष केंद्रित करते एक म्हणजे व्यासपीठ आणि दुसरे आवाज. हे प्रदर्शन या विचार प्रक्रियेचा विस्तार आहे जिथे आम्ही माध्यम साक्षरतेद्वारे हेतू समजून घेण्यावर चर्चा करू इच्छितो.
प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सिटीझन जर्नालिझम, फिल्म्स, रेडिओ, सोशल मीडिया, फोटोग्राफी आणि संस्थेच्या ड्रीमलॅब प्रकल्पावरील स्टॉल या विषयांशी संबंधित विविध विभागांवर चर्चा आणि प्रकाश टाकणारे स्टॉल्स आहेत.
प्रदर्शन भेट देण्यासाठी – https://sbfmediaexhibition.com
सलाम बॉम्बे फाउंडेशनबद्दल:
सलाम बॉम्बे फाउंडेशनने २००२ मध्ये मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये वाढणाऱ्या १२ ते १७ वर्षांच्या किशोरवयीन मुलांसोबत काम करण्यास सुरुवात केली. अनेक विद्यार्थी कुपोषित आहेत आणि त्यांना मादक पदार्थांच्या सेवनाचा धोका आहे. ते आर्थिकदृष्ट्या कमजोर घरातून आलेले आहेत, त्यांना शाळा सोडण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी, नोकरी मिळविण्यासाठी दबाव आणला जातो. हे वास्तव लक्षात घेता, सलाम बॉम्बे फाऊंडेशनने बाल अनुकूल, नाविन्यपूर्ण शिक्षण साधनांच्या क्षमतेचा उपयोग करून किशोरवयीन मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित केली आहेत.
संस्था मुलांना त्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि उपजीविकेबद्दल योग्य निवडीसाठी सक्षम करून शाळेत पाठवते. ज्यामुळे त्यांचं भविष्य उज्वल होईल. क्रीडा, कला व मीडिया अकादमीद्वारे त्यांना स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या कामगिरीची संधी मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतात. स्किल्स@स्कूल कार्यक्रम त्यांच्या करिअरच्या संधी विस्तृत करते व करिअरसाठी त्यांना व्यावसायिक कौशल्यांसह सक्षम करते.
ड्रीमलॅब उपक्रमाद्वारे, संस्थेने १४ ते १८ वर्षे वयोगटातील तरुणांना सतत कौशल्य प्रशिक्षण आणि मार्केट-आधारित इंटर्नशिपची संधी उपलब्ध केल्या आहेत. ड्रीमलॅब जुलै, २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेली आहे व नऊ जॉब क्षेत्रातील एकुण १६३ स्किल्स@स्कूल माजी विद्यार्थ्यांना स्टायपेंड आधारित इंटर्नशिप मिळवून देण्यात यशस्वी झाले आहे. ड्रीमलॅबद्वारे तळागाळातील उद्योजक किशोरवयीन विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करते. उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो. किशोरवयीन मुलांना पार्ट टाईम काम करणे आणि शाळेत राहून शिक्षण पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते.
अधिक माहितीसाठी- www.salaambombay.org