दॅट्स सॉल्व फिटनेस क्लबचा उपक्रम .
मिल्खा सिंग यांना अनोखी श्रद्धांजली .
नरवणे प्रतिनिधी (अशोक हांडे)
नरवणे तालुका माण येथील दॅट्स सॉल्व फिटनेस क्लब ने नुकताच एक अनोखा उपक्रम योजला होता.त्यामध्ये या क्लबच्या सदस्यांनी एकूण 18 किलोमीटरचं अंतर रनिंग करून मिल्का सिंग यांना अनोख्या स्वरूपाची श्रद्धांजली वाहिली.
दॅट्स सॉल्व या फिटनेस क्लबला आतापर्यंत अडीच वर्ष झालेली असून यामध्ये निवृत्त माजी सैनिक दीपक काटकर कैलाश काटकर आणि संतोष फौजी हे प्रामुख्याने सक्रिय असून यामध्ये हे एकुण सदस्यांची संख्या आता पंचवीस पर्यंत गेलेले आहे. यामध्ये तरुण वर्ग, कॉलेज युवक मोठ्या संख्येने आहेत आणि ‘शरीरसंपत्ती हीच धनसंपत्ती’ आहे असे म्हटले जाते परंतु त्याकडे समाजातील फार कमी लोक प्रयत्न करताना दिसतात परंतु या क्लबने आरोग्य, व्यायाम ,आहार या गोष्टींकडे लक्ष देऊन भविष्यात या तरुण पिढीच्या ऊर्जेला योग्य ते वळण देण्याचे काम केलेलं दिसतं आणि वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम घेऊन हा फिटनेस क्लब खऱ्या अर्थाने कौतुकास्पद कार्य करत आहे अशी चर्चा परिसरातून आहे.
आज शुक्रवारी सकाळी नरवणे ते गोंदवले आणि गोंदवले पासून पुन्हा नरवणे असे अठरा किलोमीटर रनिंग करत मिल्का सिंग यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली .नरवणे येतील बहुसंख्य तरुण हे देश सेवेमध्ये आहेत आणि देशसेवा करण्याची प्रेरणा माजी सैनिकांकडून त्यांना वेळोवेळी मिळत असते. सध्या गावातील नवयुवक देखील सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची असा मनोधर्य मनाशी बाळगून असतात. परंतु त्यासाठी लागणारे योग्य मार्गदर्शन ,आहार, व्यायाम, उत्तम आरोग्य, वजन उंची याचं योग्य मार्गदर्शन गावातीलच निवृत्त माजी सैनिक करत असतात. या फिटनेस क्लब चे सदस्य नवतरुणांना मोफत मार्गदर्शन त्याबरोबर व्यायामाची योग्य पद्धत शिकवतात आणि देशसेवेची प्रेरणा उद्दीपित केली जाते.
21 जून या जागतिक योग दिना दिवशी जे तरुण व्यायामाचा आळस करतात त्यांना व्यायामाचं महत्त्व देखील पटवून दिलं गेलं आणि सध्याची पिढी ही प्रदूषणाच्या ,व्यसनांच्या विळख्यात सापडलेली आहे आणि यातून मुक्त व्हायचं असेल तर एका वेगळ्या आत्मविश्वासाची गरज असते.आणि हा आत्मविश्वास व्यायामाशिवाय वाढत नाही असेही मत क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केले.
दीपक काटकर फौजी, कैलाश काटकर फौजी, संतोष काटकर फौजी यांच्या मुख्य जबाबदारीतून निर्माण झालेला हा क्लब सध्या वाढताना दिसतो. चेतन काटकर, गणेश काटकर, अनिकेत काटकर, सिद्धांत काटकर, अनिरुद्ध पिसाळ ,हर्षद काटकर, तसेच अथर्व मोहोळकर आणि श्रेयस काटकर अशी काही सक्रिय सदस्यांची नावे आहेत. भविष्यातही आमच्याकडून देशसेवा घडावी व देशासाठी आमच्याही जवानांनी सक्रिय सहभाग घ्यावा असा आत्मविश्वास गणेश काटकर यांनी बोलून दाखवला.