…अन्यथा दंडात्मक कारवाई : जत पोलिस प्रशासन
माणगंगा न्यूज जत:-
जत शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या चढउतारामुळे प्रशासन चिंतेत असून जत शहरासह तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जत शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी अत्यावश्यक सेवा वगळता दुपारी चार पर्यंतच आपला व्यवसाय करावा अन्यथा नियम न पाळणारे व्यवसाईकांची दुकाने सिल करून त्यांच्यावर कोविड साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.असा इशारा जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यानी दिला.
जत शहरासह तालुक्यात कोरोना आटोक्यात येत असतानाच व प्रशासनाने लाॅकडाऊन चे कडक निर्बंध शितील केल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. सांगली जिल्हा हा तिसरे टप्प्यात येत असल्याने या जिल्ह्यात जिल्हाधिकारी श्री.अभिजित चौधरी यांनी सर्व व्यवसाईकांना अत्यावश्यक सेवा ,हाॅस्पीटल, मेडीकल दुकाने व दूध डेअरी वगळता सर्व अस्थापना या सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने आदेश देऊनही जत शहरात मात्र दुपारी चारनंतरही प्रमुख बाजारपेठेतील सर्वच दुकाने उघडी असतात. दुकानदारांकडून किंवा ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंग चे पालन केले जात नाही. त्यामुळे शहरात नागरिकांची व वाहनधारकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.
येथील पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व त्यांचे पोलीस कर्मचारी यानी दुपारी चारनंतरही बाजारपेठेत सूरू असलेल्या अस्थापना बंद करण्याचे वारंवार आवाहन करूनही व्यापारी वर्गाकडून पोलीस प्रशासनाच्या या आवाहनाला चांगली साथ न मिळाल्याने आज जतचे पोलीस निरीक्षक श्री. आप्पासाहेब कोळी यानी जत येथिल बाजार पेठेतील सराफ व्यवसाईक, कापड व्यापारी असोसिएशन, जत शहर व्यापारी असोसिएशन, बेकरी व्यवसाईक, किराणा व्यवसाईक यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेतले व व्यापारी बंधूना कोरोनाचे पार्श्वभूमी वर प्रशासनाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशानुसार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतच व्यवसाईकांनी आपली दुकाने उघडी ठेवणेची असून दुपारी चार नंतर कोणीही आपली दुकाने उघडी ठेवणार नाही. याची दक्षता व्यापारी बांधवानी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.
तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे जे व्यवसाईक पालन करणार नाहीत त्या व्यवसाईकांची दुकाने सिल करून त्यांच्यावर कोविड साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.
या बैठकीत जत शहर व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष किरण बिज्जरगी, जत कापड व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्री. पांडुरंग बामणे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण पोतदार यांनी सांगितले की, आम्ही आमची दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवत असून त्यानंतर जे दुकानदार आपली दुकाने उघडी ठेवतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा.
यावेळी कापड व्यापारी असोसिएशन चे उपाध्यक्ष तोष्णीवाल ,सचिव अरविंद ओसवाल,किराणा व्यवसाईक पटाईत, साळे ,आदी व्यवसाईक उपस्थित होते.