कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनुसूचित जातीच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी ‘स्माईल’ कर्ज योजना !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे व्यवसाय उभारून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाव्दारे स्माईल कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
स्माईल कर्ज योजनेबद्दल : या योजनेंतर्गत एक ते पाच लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार असून, एनएसएफडीसी सहभाग ८० टक्के, भांडवल अनुदान २० टक्के तर सहा टक्के व्याजदर व परतफेडीचा कालावधी सहा वर्षे असा राहणार आहे.
पात्रता व निकष :
अर्जदार अनुसूचित जातीतील असावा.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असावे.
मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० या दरम्यान असावी.
अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा.
मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : महानगरपालिका/ नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्रधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यापैकी एक दस्तावेज आवश्यक आहे.
योजनेंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी मयत व्यक्तीचे नाव व पत्ता
आधारकार्ड
उत्पन्नाचा दाखला (तीन लक्ष पर्यंत)
कोरोनामुळे मरण पावलेल्या
व्यक्तीचा मृत्यूचा दाखला
रेशन कार्ड
वयाचा पुरावा
वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रानिशी कर्ज मागणीचा प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.