आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या गाडीचा अपघात
आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू माजी समाज कल्याण सभापती व सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांच्या गाडीचा अपघात झाला असून त्यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत
यामध्ये माजी समाज कल्याण सभापती व जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर , विभूतवाडी चे सरपंच चंद्रकांत पावणे, दिलीप पावणे व मोहन खर्जे सर्वच किरकोळ जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहे
विटा कुंडल रोड वर अपघात झाला असून एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीचा समोरासमोर अपघात झाला आहे जखमींना विटा येथील दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे