महागाई विराेधात आंदाेलनाची रूपरेषा बैठक !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतिने दिनांक 7 ते 17 जुलै पर्यन्त पेट्रोल, डिझेल एल. पी. जी. गॅस व जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या महागाई विरोधात राबविण्यात येणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या कोअर कमिटीची बैठक दिनांक :6जुलै 2021 गांधी भवन, मुंबई येथे संपन्न झाली.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व अनुसूचित जाती विभागाचे प्रभारी, माजी समाज कल्याणमंत्री मा. चंद्रकांत हांडोरेजी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या, अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रभारी मा. मनोज बागरीजी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष मा. विजयजी अंभोरे हे होते.
या प्रसंगी, महिला विभागाच्या प्रमुख मा. श्रीमती प्रतिमाताई उके, प्रदेश उपाध्यक्ष सर्व मा. श्री. संजय मेश्राम, मा. हर्षवर्धन निकोसे, मा. जयवंत काथवटे, मा. प्रशांत पवार, मा. राजेश लाढे, मा. पवन डोंगरे, मा. श्रीमती अश्विनीताई खोब्रागडे, मा. साहेबराव सिरसाट, मा. ब्रहदेव इंगळे, मा. नंदकिशोर मोरे. मा. सुजीत यादव, मा. नितीन शिवशरण, मा. महेश मेंढे, मा. सुभाष पाखरे, मा. लक्ष्मणराव घुमरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महागाई विरोधातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी रणणिती ठरविण्यात आली.