सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी गायब, मात्र लाईट व पंखे सुरू
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडीतील सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांचा कहरच झाला असून कार्यालयांमधून अधिकारी गायब असतात तर कार्यालयातील लाईट व पंखे चालूच असतात यातील काही अधिकारी यांना फोन केले असता फोन जाणून-बुजून कट केले जातात व ठोस असे कोणतेही उत्तर दिले जात नाही.


एकतर कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे आणि त्यामध्ये जे कर्मचारी आहेत ते अनेक वेळा कार्यालया बाहेरच असतात. कार्यालयामध्ये कोणी अधिकारी नाही, कुठे गेले आहेत असे विचारले असता खाजगी व्यक्ती आम्हाला माहीत नाही अशी उत्तरे देतात तर अधिकाऱ्यांना फोन लावले असता फोन कट केले जातात.
आशा कर्मचाऱ्यांना कोणी आळा घालणार का,? हा गंभीर प्रश्न आहे. ऑफिसमध्ये कोणताही कर्मचारी नसताना पंखे आणि लाईट ची हजेरी मात्र असते. कार्यालयांमध्ये कर्मचारी असो या नसो लाईट सतत चालू असते ,आणि पंखे ही सतत चालू असतात अशा या बेशिस्त अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी होत आहे .







