• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बोगस विद्यापीठवाल्याने राज्यपालांना दिले बोगस पीएचडी वाटप कार्यक्रमाचे आमंत्रण

माणगंगा by माणगंगा
January 3, 2023
in मुंबई
0
बोगस विद्यापीठवाल्याने राज्यपालांना दिले बोगस पीएचडी वाटप कार्यक्रमाचे आमंत्रण

बोगस विद्यापीठवाल्याने राज्यपालांना दिले बोगस पीएचडी वाटप कार्यक्रमाचे आमंत्रण

स्प्राऊट्स Exclusive

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनात चक्क बोगस विद्यापीठाच्या संस्थापकाचा सत्कार केला. त्याच्याशी निवांत चर्चा केली, इतकेच नव्हे त्याच्याकडून या विद्यापीठाच्यावतीने दिल्ली येथील होणाऱ्या बोगस पीएचडी पदव्या वाटपाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही स्वीकारले, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.

इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी – International Internship University (IIU) हे संपूर्णतः बोगस विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची जगातील कोणत्याही देशात नोंदणी नाही. पियुष पंडित (Peeyush Pandit ) हा भामटा या बोगस विद्यापीठाचा संस्थापक आहे. या भामट्याने आतापर्यंत शेकडो जणांना बोगस पीएचडी विकल्या आहेत. यातून त्याने कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली आहे. या भामट्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा तोतया सचिव उल्हास मुणगेकर याची साथ आहे, अशी  खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या ‘एसआयटी’च्या हाती आलेली आहे.

पीयूष पंडित हा देशविदेशातील भारतीय लोकांना आपल्या जाळ्यात ओढतो. त्यांना दिल्ली येथे बोलावून मोठ्या हॉटेलमधील कार्यक्रमात बोगस पीएचडी पदव्या विकतो. ही बोगस पीएचडी अधिकृत वाटावी, यासाठी हा भामटा कार्यक्रमाला पोलीस, वकील आणि सरकारी कार्यालयातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना बोलावतो व त्यांच्या हस्ते बोगस पीएचडी देतो, असे आढळून आलेले आहे.

दिल्ली येथील पोलीस ऑफिसर किरण सेठी यांना या भामट्याने एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. त्यांच्या हस्ते काही जणांना बोगस पीएचडी वाटण्यात आल्या.

पंडित नावाच्या भामट्याने राज्यपाल कोश्यारी यांना चक्क त्याच्या फेक विद्यापीठाचे ब्रोशर व इतर भेटवस्तूही दिलेल्या आहेत, सोबत त्याने आमंत्रण पत्रिकाही दिली. ‘स्प्राऊट्स’च्या वाचकांसाठी हा exclusive फोटो आम्ही प्रकाशित करीत आहोत. 

या बोगस आभासी विद्यापीठाच्या बोर्डावर मुंबईतील Panbai International School च्या मुख्याध्यापिका प्रतिभा मिश्रा, भानू प्रताप सिंह, के. एल. गांजू, टी. एन. शिरीष कुमार, संदीप मारवाह, प्रकाश जोशी, संजीव सेहगल, एन. डी. माथूर, श्याम सुंदर पाठक  यांचा समावेश आहे.

भगत सिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. याशिवाय ते महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहेत. मात्र त्यांच्या कारकिर्दीत शिक्षणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. याशिवाय भ्रष्टाचारही प्रचंड बोकाळलेला आहे. ‘स्प्राऊट्स’ने या भ्रष्टाचाराविरोधात रान उठवले. राज्यपालांशी लेखी पत्रव्यवहार केला, प्रसंगी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यासंबंधीत कागदपत्रांच्या फाईल्सही दिल्या. मात्र राज्यपालांना केवळ सत्कार समारंभाचे कार्यक्रम करण्यातच रस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, तरीही राज्यपाल बेफिकीर आहेत. 

राज्यपालांचे सचिव उल्हास मुणगेकर हे नियमबाह्य पद्धतीने बसलेले आहेत. राजभवनात बोगस पीएचडी पदव्या  वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला. बोगस पीएचडी देणाऱ्या संस्थेनेही राज्यपाल कोश्यारी यांचे हस्ते या सर्वांचा सत्कार केला. इतकेच नव्हे तर आतापर्यंत असंख्य बोगस विद्यापीठांना जन्म देणारा मधू क्रिशन याचाही राज्यपालांनी सत्कार केला, त्याच्याबरोबर ब्रेकफास्ट केला.

यातून ही बोगस विद्यापीठे अधिकृत असल्याचा संदेश जाईल याची व्यवस्था केली. या सर्व गैरकृत्यांचा मास्टरमाइंड हा मुणगेकर आहे.

मुणगेकर या भामट्याची कारकीर्द अत्यंत भ्रष्ट आहे. राजभवनातून हा भामटा बोगस पीएचडीचे रॅकेट चालवत आहे. याबाबत ‘स्प्राऊट्स’ने वारंवार तक्रारी करूनही राज्यपाल कोश्यारी व राजभवन प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे, मात्र यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार अधिकाधिक बोकाळत चाललेला आहे व विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

Views: 154
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बोगस विद्यापीठवाल्याने राज्यपालांना दिले बोगस पीएचडी वाटप कार्यक्रमाचे आमंत्रण

बोगस विद्यापीठवाल्याने राज्यपालांना दिले बोगस पीएचडी वाटप कार्यक्रमाचे आमंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)